Tuesday, January 18, 2022

लसीकरण : १५ ते १८ वयोगटातील मुलांची लसीकरणासाठी एक जानेवारीपासून कोविन ॲपवर नोंदणी

१५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोन लस दिली जाणार असून त्यासाठी एक जानेवारीपासून नोंदणी सुरू होणार आहे. कोविन प्लेटफॉर्मचे चीफ डॉ. आरएस शर्मा यांनी सांगितले की, लसीकरणाच्या नोंदणीसाठी कोविन ॲपचा (Cowin app) वापर करावा. देशात नववर्षापासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना लस दिली जाणार आहे.

पुढे शर्मा म्हणाले की, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शाळेचा दहावीचा आयडीकार्ड देखील नोंदणीसाठी अधिकृत धरले जाईल. कारण अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा दुसरा कोणत्याही प्रकारे ओळखपत्र नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात सध्या 15 ते 18 या वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ड्रग्ज कंट्रोलरने भारत बायोटेकच्या लसीला 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली आहे. मात्र सरकारने सध्या 15 ते 18 वयोगटातील मुलांच्याच लसीकरणाला परवानगी दिली आहे.

ऑफिशियल आकडांनुसार, देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांची संख्या सुमारे 10 कोटी आहे. त्यामुळे या मुलांचे लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून लहान मुलांच्या लसीकरणाची मागणी केली जात होती. त्यापार्श्वभुमीवर आता 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

जगभरातील सुमारे 30 पेक्षा अधिक देशात लहान मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. क्यूबा देशात दोन वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील लहान मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर दक्षिण कोरिया. ऑस्ट्रेलिया आणि फिलीपाइन्स या देशात 12 वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जात आहे.

कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन कसे कराल ?

  • सुरुवातील तुम्हाला कोविन हे ॲप घ्यावे लागणार आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.cowinapp.app&hl=en_IN&gl=US त्यानंतर त्यात आपला मोबाइल क्रमांक टाका. OTP द्वारे त्याला लॉग इन करा.
  • आता आधार कार्ड, ड्रायविंग लायसेंस, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेंशन पासबुक, NPR स्मार्ट कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड यापैकी एक प्रूफ निवडा.
  • तुम्ही निवडलेल्या आयडीचे नंबर त्यात टाका (उदा. आधार कार्डचे 12 अंक) त्यानंतर लिंग निवडा आणि आपला जन्म दिनांक प्रविष्ट करा.
  • त्यानंतर आपल्या परिसरातील पिन कोड टाका. आता तुम्हाला लसीकरण सेंटरची यादी आली असेल.
  • त्यानंतर तुम्हाला कोणत्या कंपनीची लस घ्यायची, केव्हा आणि कधी घ्यायची हे प्रविष्ट करा. त्यानंतर लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्या.
  • लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर आपल्याला एक रेफरेंस आयडी आणि सिक्रेट कोड द्यावा लागणार आहे. जो तुम्ही कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन केल्यावर मिळतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter