उद्धव ठाकरे यांचा तळेगावमध्ये शेतकऱ्यांशी संवाद

सरकारकडे पक्ष फोडायला पैसा, पण शेतकऱ्यांसाठी नाही:उद्धव ठाकरेंची टीका

युवावार्ता (प्रतिनिधी)
तळेगाव –
राज्यात पावसाने दडी मारली आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. राज्यातल्या विविध भागांत जनावरांच्या चार्‍याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. पावसाअभावी राज्यात दृष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. शेतकर्‍यांच्या डोळ्यांसमोर पीके करपू लागल्याने त्यांचा धीर खचला आहे. खचलेल्या शेतकर्‍यांच्या मनाला धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डी मतदार संघातील अनेक गावांना भेट देत शेतकर्‍यांशी संवाद साधला. तालुक्यातील तळेगाव दिघे आणि वडझरी येथील शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळाची पहाणी करण्यासाठी शिर्डी मतदार संघात आले होते. शिर्डी जवळील काकडी गावात शेतकर्‍यांच्या बांधावर असताना एका शाळकरी मुलाने उद्धव ठाकरेंना ठेचा-भाकरी असलेली शिदोरी दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुलाची आस्थेने चौकशी करून हीच माझी आशीर्वादाची शिदोरी म्हणत मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील कोपरगावामधील शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. दुबार पेरणी करूनही पिके आलेली नाहीत. बियाणे-खतांचा खर्च वाया गेलेला आहे. सप्टेंबर उजाडला तरी पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांच्या हाती आता काहीच लागणार नाही. अशी सगळी परिस्थिती असताना सत्ताधारी ‘शासन आपल्या दारी’ नावाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कुणी वाली उरलाय की नाही अशी परिस्थिती आहे. पण शेतकर्‍यांनी धीर सोडू नये. वेडेवाकडे पाऊल उचलू नये. मी फक्त आपल्याला आश्‍वासन द्यायला आलो नाही तर मुंबईत जाऊन या सगळ्याचा मी पाठपुरावा करेन. शक्य तेवढी मदत मी आपल्याला मिळवून देईल असा शब्द उद्धव ठाकरे यांनी खचलेल्या शेतकर्‍यांना दिला.


शासन आपल्या दारी या उपक्रमाबाबत उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना प्रश्‍न विचारला खरच शासन आपल्या दारी आले का? तर अनेक शेतकर्‍यांनी नाही म्हणत सरकारच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या पार्श्‍वभुमीवर निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडावे, पिक विम्याचा लाभ मिळावा, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई त्वरीत मिळाली अशी मागणी यावेळी अनेक शेतकर्‍यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी ठाकरेंनी त्यांना धीर देत आमच्या काळात शेतकर्‍यांना थेट मदत झाली होती. आताही अशी मदत मिळून देण्यासाठी आम्ही सरकारशी भांडू. या दुष्काळात राजकारण न करता शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर उभे राहू, तुम्हीही धीर सोडू नका असे म्हणत त्यांनी तळेगाव व वडझरी येथील शेतकर्‍यांना धीर दिला.उद्धव ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा प्रमुख मुजीब शेख, तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे, शहर प्रमुख अमर कतारी, माजी तालुका प्रमुख जनार्दन आहेर उपस्थित होते.

सरकारकडे पक्ष फोडायला पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही, अशी जहरी टीका शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी केली. ते शिर्डीमध्ये बोलत होते. ठाकरे यांनी आज काही दुष्काळी भागाची पाहणी केली. शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले.सध्याचे सरकार निर्दयी आणि निर्घृण आहे. शेकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि तो मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून नुकसानीची पाहणी करावी. दुबार पेरणीनंतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कारभार शून्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार लवकरात लवकर जावो, अशी मी साईचरणी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली. हे सरकार निर्दयी असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारमधील मंत्र्यांना काम करता येत नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकरी 50,000 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी शेतकरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळसदृश परिस्थिती असताना पालकमंत्री मात्र अदृश्य आहेत, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. जी पिके करपून गेली आहे, पीकांमध्ये आता दाने भरली जाणार नाही, असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की, दुष्काळ उंबरठ्यावर असताना जुनी नुकसान भरपाई कधी मिळेल. एक रुपया वीमा म्हणतात. पण, अर्ज भरण्यासाठी किती रुपये जातात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून विमा भरतो. राज्य सरकार शेतकऱ्यांचा विमा भरतो. 1 रुपयात पीकविमा ही जी योजना आणली आहे. त्यांचे पंचनामे कधी होणार असून ते पैसै शेतकऱ्यांना कधी मिळणार आहेत, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पावसात भिजत आज दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख