Wednesday, October 20, 2021

Tokyo 2020 : ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय महिलांनी उपांत्यफेरीत मारली धडक

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केलाय. भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केलाय.

खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं. जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला.
भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल नेटवर्किंगवरही मोठ्याप्रमाणात आनंद व्यक्त केला जात असून ट्विटरवरील टॉप ट्रेण्डींग विषयांपैकी अनेक हॅशटॅग हे याच सामन्यासंदर्भातील आहेत.

रविवारी भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवत ४९ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सामना संपल्याची शिटी वाजवल्यानंतर भारतीय हॉकीपटूंनी जल्लोष साजरा केला. भारताच्या यशात दिलप्रीत सिंग (७व्या मिनिटाला), गरुजत सिंग (१६व्या मिनिटाला) आणि हार्दिक सिंग (५७व्या मिनिटाला) यांनी मैदानी गोलची नोंद केली. ब्रिटनकडून सॅम वॉर्डने एकमेव गोलची नोंद केली. येत्या मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची विश्वविजेत्या बेल्जियमशी गाठ पडणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व सामन्यात स्पेनला ३-१ असे हरवून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. दुसरी उपांत्य लढत ऑस्ट्रेलिया-जर्मनीमध्ये होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...