Wednesday, October 20, 2021

दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार

श्रीनगर : दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झालेत. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल मध्ये शनिवारी भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्यानं दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील त्रालमधल्या जंगलाच्या उंच भागात घेराव घालून सर्च ऑपरेशन राबवलं.

सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. ज्यानंतर दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु झाली. दहशतवाद्यांकडून एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले. ठार झालेल्या एक दहशतवाद्याचा नाव मुसाएब मुश्ताक असल्याचं सांगितलं जात आहे. काश्मीरच्या IGP विजय कुमार यांनी सांगितलं की, मुसाएब हा खिरयूचा रहिवासी आहे. त्यानं 23 जुलैला सरकारी शाळेतील एका शिपायाची हत्या केली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चकमक सुरू असून परिसरात अन्य दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी पंपोरमध्ये दोन दहशतवादी ठार शुक्रवारी अवंतीपोराच्या पंपोर भागात आज भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. बराच तास चाललेल्या चकमकीनंतर भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनच्या हिट स्क्वॉयडचा एक भाग होते. तसंच त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांची हत्या ही केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...