Wednesday, May 5, 2021

संगमनेर मधील प्राथमिक शिक्षकांनी उभारलेल्या ‘कोविड केअर’ सेंटर चे काम राज्यातील शिक्षकांसाठी दिशा दर्शक

संगमनेर (प्रतिनिधी) – राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य मिलिंद कानवडे व संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी ‘कोविड सेंटर’ ची संकल्पना मांडली. संगमनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी मानवतेच्या भावनेतून प्रतिसाद दिला. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा निधी संकलन करतांना प्रत्येक केंद्रातील केंद्रप्रमुख ,तंत्रस्नेही शिक्षक व विविध शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य केले.यातून चंदनापुरी येथे प्राथमिक शिक्षक व शिक्षण विभाग पंचायत समिती संगमनेर यांच्या वतीने शंभर बेडचे कोविड केअर सेंटरचे उदघाटन नाशिक पदवीधर विभागाचे आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले.


महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षकांनी सुरू केलेले असे पहिलेच सेंटर ठरले. संगमनेर तालुक्यात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता या सेंटरचा गरजूंना लाभ होत आहे. चार ते पाच दिवसातच पंचावन्न पेशंट येथे उपचार घेत आहे.
प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम,गटविकास अधिकारी सुरेश शिंदे व तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश घोलप यांनी कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम उपलब्ध करून दिली. मेडिकल ऑफिसर डॉ. लोहारे डॉ.कवटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालू आहे.
संगमनेर तालुक्यातील इंजिनीयर असोसिएशन यांच्या वतीने येथील रुग्णांना अंडी दिली जात आहे. सदर अंडी सेंटर मध्ये पोचवण्याचे काम बाळासाहेब गुंजाळ सर करत आहेत. सेंटरचे समन्वयक के.के. पवार तसेच आर. पी .राहणे हे येथील बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष देऊन जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आर .पी .रहाणे सर रोज सकाळ , दुपार व संध्याकाळ माहिती घेऊन ती वरिष्ठांना देत असतात. स्वतः रुग्णां जवळ जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांना धीर देण्याचे काम करत असतात. याकामी त्यांना शिवाजी आव्हाड, गौतम मिसाळ , माधव हासे, रवीन्द्र अनाप,नंदू राहणे,राजेंद्र कडलग, पोपट काळे व गवनाथ बोऱ्हाडे मदत करत असतात.


हे सेंटर उभारताना सिंधू लॉन्स चे मालक नरेंद्र राहणे यांनी आपले कार्यालय मोफत उपलब्ध करून दिले. तसेच मंडप व इतर काम ओमकार वाळे यांनी उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायत चंदनापुरी यांच्या वतीने पाण्याचे जार रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. अण्णा राहणे यांनी दैनंदिन वापरावयाचे पाणी उपलब्ध करून देत आहेत. चंदनापुरी येथील रवींद्र सरोदे व सागर राहणे यांनी रुग्णांना रोज चहा आणि नाश्त्याची सोय केलेली आहे. झोळे गावातील विविध संस्था व ग्रामस्थ यांच्या वतीने पंचवीस बेड या सेंटर साठी उपलब्ध करून दिले. रुग्णांची ऑक्सीजन लेव्हल वाढवण्यासाठी रोज सकाळी योगा ,त्यांचे मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी समुपदेशन व त्यांचा वेळ सत्कारनी लावण्यासाठी वाचनालय इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम सेंटरमध्ये शिक्षकांनी उपलब्ध करून दिले आहेत.
यावेळी सेंटर मधून डिस्चार्ज मिळालेल्या अश्विनी भालेराव हिने जाताना अभिप्राय दिला. ‘मला व माझ्या कुटुंबाला कोरोना झाल्याने आम्ही पुण्यावरून आमच्या चंदनापूरी गावी आलो. आम्ही पॉझिटिव्ह असल्याने आम्हाला या सेंटर मध्ये दाखल केले. येथे आल्यानंतर आम्ही पेशंट आहोत हे विसरून गेलो. संगमनेर मधील प्राथमिक शिक्षकांनी सुरू केलेल्या या सेंटरमध्ये मला नवीन जीवदान मिळाले’. अशी बोलकी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

संगमनेर मधील प्राथमिक शिक्षकांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून संवेदनशीलता जपुन उभे केलेले कोविड सेंटर राज्यातील शिक्षकांसाठी दिशादर्शक ठरत आहे. अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच शिक्षकांचे कोविड सेंटर सुरू झाल्याने त्याची प्रेरणा घेऊन अकोले तालुक्यातही शिक्षकांनी सेंटर सुरू केले आहे. त्याचबरोबर कोपरगाव, राहुरी, पारनेर ,जामखेड, कर्जत ,श्रीगोंदा व अहमदनगर यासह उर्वरित तालुक्यांमध्ये प्राथमिक शिक्षकांनी खूप मोठे योगदान कोरोना महामारी च्या काळात दिले आहे. तसेच आपल्या एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. ज्या ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती येतात त्या त्या वेळेस प्राथमिक शिक्षक नेहमीच पुढे असतात. कोरोनाला हरवण्यासाठी व मानवता जिवंत ठेवण्यासाठी संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी केलेला प्रयत्न कौतुकाचा विषय ठरत आहे.

2 प्रतिक्रिया

  1. संकट काळात प्राथमिक शिक्षकांप्रमाणे माध्यमिक, उच्च माध्यमिक , व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक पुढे आल्यास खूप मदत होईल

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,914चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

डॉ. अमोल जंगम यांचे निधन

अतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...

पत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;

संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...

भारतीय जनता पार्टी उत्तर अहमदनगर ओबीसी मोर्चा सरचिटणीस पदी भारत गवळी यांची निवड

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब गाङेकर यांनी संगमनेरात मागील अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे...

संगमनेर मधील प्राथमिक शिक्षकांनी उभारलेल्या ‘कोविड केअर’ सेंटर चे काम राज्यातील शिक्षकांसाठी दिशा दर्शक

संगमनेर (प्रतिनिधी) - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य...

अज्ञात इसमांकडुन बदाम वृक्षाची तोड; वृक्षप्रेमींमध्ये संताप

संगमनेर (प्रतिनिधी)स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर या अंतर्गत संगमनेर नगरपालिकेने पूणे नाशिक महामार्गालगत अनेक वृक्ष लावलेले आहेत. निमोण...