Tuesday, January 18, 2022

घुलेवाडीत जिल्ह्यातील महिला बचत गटाची पहिली सुपर शॉपी सुरू ; 30 बचत गटांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सौ दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर तालुक्यात महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण झाले असून घुलेवाडी येथे 30 बचत गटांच्या माध्यमातून यावर्षी जिल्ह्यातील पहिली महिला बचत गटाची सुपर शॉपी सुरु झाली असून हा अभिनव उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे.

घुलेवाडी येथे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटाचे सुपर शॉपी चे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसभापती नवनाथ आरगडे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, व्यवस्थापक रवींद्र खराटे, रेश्मा पाटील प्रशांत पानसरे, ग्रामविकास अधिकारी कुटे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सौ सुनंदाताई जोर्वेकर म्हणाल्या की, दोन वर्षापूर्वी महिलांनी एकत्र येऊन गावांमध्ये तीस महिला बचत गटांची स्थापना केली .या बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण, महिलांची आरोग्य सक्षमीकरण यावर भर देण्यात आले. मात्र कोरोनाचे संकट आले आणि बरेच कामकाज थांबले. तरी ही महाराष्ट्र शासनाच्या शासकीय योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्यातील पहिली सुपर शॉपी घुलेवाडी येथे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्व महिला भगिनींना मोठा सहभाग असून महिलांना बळकटी दिली तर त्या कुटुंबाप्रमाणे समाजाचे चांगले व्यवस्थापन करू शकतात. या महिला सुपर शॉपी साठी ग्रामपंचायत ने मोठे सहकार्य केले असून उमेद बरोबर केलेल्या करारा मुळे एचडीएफसी बँकेत सुपर शॉपि साठी कर्ज पुरवठा केला आहे. या सर्वांच्या सहकार्यातून हा अभिनव उपक्रम नक्की यशस्वी होईल असे त्या म्हणाल्या.

तर उपसभापती नवनाथ आरगडे म्हणाले की ,एचडीएफसी बँक आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या सहयोगातून होत असल्याने ही सुपर शॉपी इतर सर्व गावांसाठी महत्त्वाची व मार्गदर्शन करणारे असून सर्वांनी या सुपर शॉपी इथूनच खरेदी करावे.

तर गटविकास अधिकारी अनिल नागणे म्हणाले की, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून गावातील नागरिक व शासकीय कर्मचारी यांनी सुद्धा या सुपर शोपी मधूनच खरेदी करावे यापुढेही इतर गावांमध्ये महिला बचत गटांचे काही उपक्रम असतील तर शासनाकडून व पंचायत समितीकडून त्यांना नक्की सहकार्य करू असेही ते म्हणाले.

या अभिनव उपक्रमाचे नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,सौ कांचन ताई थोरात ,इंद्रजीत भाऊ थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, सुनील कुमार पठारे, श्रीमती मंजुषा धीवर ,ज्ञानेश्वर गव्हाणे, सौ निर्मलाताई गुंजाळ, जि. प. सदस्य सिताराम राऊत, सरपंच दत्तू राऊत यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter