Saturday, May 1, 2021

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)
मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली होती. ही लागलेली आग दोन दिवसानंतरही धुमसत आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वार्‍याने दुपारी नियंत्रणात आलेली ही आग पुन्हा एकदा भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हि आग पुन्हा भडकली त्यामुळे आजूबाजूच्या गोदामांना धोका निर्माण झाला होता. वादळाने दैना उडविल्याने दुपारनंतर माघारी पाठवलेले जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अग्निशमन बंब पुन्हा माघारी बोलावले लागले. या घटनेवरून वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकीरपणा व दिरंगाई घातक ठरल्याचे दिसत आहे.

मंगळवारी रात्री वखार महामंडळाच्या गोदामाला अज्ञात कारणांमुळे भीषण आग लागली होती. मात्र ही आग विझविण्यासाठी अ ग्निशमन दला व्यतीरीक्त संबधित अधिकार्‍यांनी फारसे गांभीर्य न दाखविल्यामुळे हि आग दोन दिवस तेवत राहिली. मंगळवारी रात्री पुन्हा या आगीने रौद्र रूप धारण केल्याने संगमनेरसह प्रवरा सहकारी साखर कारखाना, अगस्ती सहकारी साखर क ारखान्याचे बंब, सिन्नर, शिर्डी, राहाता, राहुरी व श्रीरामपूर येथील बंब बोलवावे लागले.
दरम्यान या गोदामामध्ये प्रत्येकी 170 किलो वजनाच्या कापसाच्या 13 हजार 165 गाड्या (मूल्य 17 कोटी 37 लाख), नाफे डने हमीभावानुसार खरेदी केलेला 2 कोटी 13 लाख रुपये मूल्याचा 4 लाख 41 हजार 150 किलो चना, पाच लाख रुपये मूल्याची 12 हजार 500 किलो मिरी, दोन लाख रुपये मूल्याचे 12 हजार 10 किलो सोयाबिन, सात लाख रुपये मूल्याची 70 हजार किलो बाजरी आणि 10 हजार 500 किलो गहू असा एकूण 19 कोटी 96 लाख रुपयांचा अन्नधान्य व कापसाचा साठा आणि 2 कोटी रुपयांचे गोदाम असा एकूण 21 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

गोदामात मोठ्या प्रमाणात कापसाच्या गंजी असल्याने हि आग पेटतच राहिली. ‘अप्रशिक्षीत’ कर्मचार्‍यांचा अभाव, संबंधित अ धिकार्‍यांचा बेफिकीरपणा व दुर्लक्ष यामुळे काही वेळातच संपूर्ण गोदाम आगीच्या प्रचंड ज्वाळांनी भक्ष्यस्थानी पडले. एकूण अकरा बंबांंद्वारा पाण्याचा मारा करूनही दोन दिवसात ही आग विझली नाही. त्याच दरम्यान बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह वादळाचीही भर पडल्याने या आगीचा पुन्हा एकदा भडका उडाला.
दरम्यान ही आग लागल्यानंतर स्थानिक अधिकारी व कार्यकर्त्यांनी ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वखार महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांनी मात्र या घटनेला गांभीर्याने घेतले नाही. केवळ दोन अधिकार्‍यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. ही आग आटोक्यात आण्यासाठी कराव्या लागणार्‍या विविध उपाययोजनांकडे दुर्लक्ष करुन दोन दिवस केवळ बाहेरुन पाण्याचा मारा सुरु ठेवला. ही आग गोदामातील गाठींना लागल्याने ती भडकत राहिली. आग लागल्यानंतर या गाठी मोकळ्या करुन आतमध्ये पाणी मारणे गरजेचे होते. मात्र केवळ बाहेरुनच पाण्याचा मारा केल्याने आत पेटलेली आग भडकत राहिली. संबंधित अधिकारी केवळ बघ्याची भुमिका घेत राहिल्याने दोन दिवसांपेक्षा जास्त काळ ही आग पेटत राहिली. आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविणे अशक्य असले तरी चोवीस तासानंतरही जर नियंत्रण मिळविता येत नसेल तर हे अपयश नेमके कोणाचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

वखार महामंडळाचे गोदाम हे बाजार समितीच्या आवारात आहे. बाजूलाच विजेचे रोहित्र आहेत. मात्र या गोदामाला लागलेली आग या विज रोहित्रामुळे लागलेली नसून इतर कारणामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या गोदामाच्या आवारात अनेक बाहेरील दारुडे, जुगारी, नशेडी व्यक्ती वावरत असतात. त्यांच्या एखाद्या कृत्यामुळेही ही दुर्घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा गोदामात आतमध्ये झालेल्या शॉर्टसर्कीटमुळेही आग लागल्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अत्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नसून आगीचे कारण गुलदस्त्यातच आहे. आगीचे कारण गुलदस्तात असले तरी रात्री धुराच्या लोटाने मात्र आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले होते. काही जणांना श्वास घेणेही कठीण झाले होते.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,904चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...