Tuesday, January 18, 2022

साधेपणाने साजरी होणार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती ; १२ जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त गावोगावी अभिवादन

संगमनेर (प्रतिनिधी)  थोर स्वातंत्र्यसैनिक व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक सहकारातील संत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची 12 जानेवारी रोजी जयंती असून हा दिवस संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जयंती  साधेपणाने होणार असून गावोगावी कोरोणाचे नियम पाळून सर्वांनी अभिवादन करावे असे आवाहन शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर यांनी केले आहे .

याबाबत आवाहन करताना बाजीराव पा. खेमनर म्हणाले की स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून ग्रामीण भागामध्ये समृद्धी निर्माण केली. आर्थिक शिस्त, काटकसर व पारदर्शकता ही त्रिसूत्री सहकारात राबवून देशात आदर्श सहकाराचे मॉडेल निर्माण केले. आज संगमनेरचा सहकार नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशात लौकिकास्पद  ठरला आहे.

 दरवर्षी अमृत उद्योग समूह व संगमनेर तालुक्याच्या वतीने 12 जानेवारी हा दिवस संपूर्ण तालुक्यात प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असून मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या जयंती महोत्सवानिमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे स्मृति पुरस्कार देऊन राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात येते. याचबरोबर दरवर्षी दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हा जयंती महोत्सव उत्तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानबिंदू ठरला असून यावर्षी मात्र कोरोना च्या संकटामुळे साधेपणाने जयंती साजरी होणार आहे .

 तरी प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी कोरोना चे नियम पाळून अभिवादन करावे असे आवाहन शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter