Saturday, July 17, 2021

T20 Worldcup : टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा ; भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात

आज शुक्रवारी ओमानमध्ये गटात कोणकोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. दोघेही सुपर-१२च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत. २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते. यात भारताने विजय मिळवला होता.

करोनामुळे टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे खेळला जाईल. ओमानमधील बैठकीत आयसीसीच्या अधिकाऱ्यांसह बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनीही भाग घेतला. टी-२० वर्ल्डकपचे सामन्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे.

२०१६ नंतरचा हा पहिला टी-२० वर्ल्डकप असेल. त्यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. सुपर-१०च्या गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारताला विंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

सरपंच असलेल्या पत्नीच्या कारभारात आता पतीराजांची ढवळाढवळ चालणार नाही ; विभागीय आयुक्तांना कारवाई करण्याचे अधिकार

संगमनेर (प्रतिनिधी)ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच्,सदस्य यांच्या नातेवाईकांकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्याविरुद्ध मुंबई...

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माळी निलंबित; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्यावर कामात कुचराई, कर्तव्यात कसूर, स्टेशन डायरीत चुकीच्या...

T20 Worldcup : टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा ; भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात

आज शुक्रवारी ओमानमध्ये गटात कोणकोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२०...

ऑनलाईन पद्धतीच्या सकारात्मक शिक्षणातून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला आकार द्यावा – प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड

संगमनेर (प्रतिनिधी )संगमनेर महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित पदव्युत्तर वर्ग प्रथमवर्ष सर्वशाखीय विषयाच्या विद्यार्थ्यासाठी स्वंयम् ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेच्या...

प्रेम जाळ्यात ओढून शेतकर्‍याला लुटण्याचा प्रयत्न – संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तीन महिलांवर गुन्हा दाखल; सावज शोधणार्‍या महिलांपासून सावधान…

संगमनेर (प्रतिनिधी)अकोल्यातील एका इसमाला आपल्या प्रेम जाळ्यात फसवून दोन लाख रुपयांना गंडवण्याचा प्रयत्न करणार्‍या एका महिलेसह तिच्या...