Tuesday, January 18, 2022

स्वस्मै स्वल्पं, समाजाय सर्वस्वं ! ललित सुरेशचंद्र ओझा यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

lalit oza

संगमनेरमध्ये अशा कितीतरी व्यक्ती आहेत की ज्यांचा ललित ओझा या व्यक्तीशी थेट संपर्क आलेला नाही मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून किंवा मित्रांच्या माध्यमातून ललित ओझा जवळजवळ प्रत्येक घरात जाऊन पोहोचला आहे. फेसबक लिस्ट मधील प्रत्येक व्यक्तिचा वाढदिवस ललित ओझा आपल्या वेगळ्याच शैलीत साजरा करीत असतो. या शैलीमुळे कितीतरी माणसे ऐकमेकांना जोडली गेली आहेत.

जगभरात गाजलेली, सोशल मिडीयामध्ये नावाजलेली संगमनेरी पाटी कितीतरी सामाजिक संदेश दररोज देत आहे. समाजासाठी सतत काहीतरी करण्याची त्याची वृत्ती मला भावते. अपघात स्थळी धावून जाणे, गरजूंना मदत करणे, समाजासाठी झटणार्‍या व्यक्तींचा सन्मान करणे हा त्याचा दिनक्रम झाला आहे. चांगले विचार आणि सकारात्मक उर्जा असणारा हा तरूण माझ्याशी कधी जोडला गेला आणि मित्र झाला हे समजलेच नाही.


लहानपणीच ललितच्या डोक्यावरील मातृछाया हरपली. वडिल सुरेशचंद्र ओझा नोकरी करीत असत. शालेय शिक्षण सुरू असताना ललितने मनाशी एक पक्की गाठ बांधली की काही झाले तरी नोकरी करायची नाही. छोटा असेल किंवा मोठा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा. परिस्थिती माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवनवीन शिक्षण आणि अनुभव देत असते. हातात भांडवल नसल्याने रोजीरोटीसाठी काय करावे हा यक्षप्रश्‍न त्याच्यासमोर होता. शालेय शिक्षण सुरू असतानाच गदर या वृत्तपत्राची विक्री ललितने सुरू केली.

ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता प्रामाणिकपणे वृत्तपत्राचे वितरण त्याने सुरू केले. यानंतर दिल्ली नाका येथे स्वत:चा पेपर स्टॉल चालू केला. यात त्याला यश मिळू लागले. आजही तो म्हणतो, ज्याने वृत्तपत्राचे वितरण केले आहे तो आयुष्यात काहीही करू शकतो. काम करताना लाज बाळगली तर आपण कामाला न्याय देऊ शकत नाही ही त्याची भावना आजही आहे. परिस्थितीमुळे आणि व्यवसायाच्या ओढीने ललितचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले.


ललितचे बंधू समीर ओझा यांनीसुध्दा काही वर्षे नोकरी केली. मात्र दोघांनी मिळून नवीन व्यवसायात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आणि ‘ओझा ट्रेडर्स’ या फर्मची सुरूवात झाली.
सुरूवात छोटी असली तरी ‘आरंभ हे प्रचंड’ म्हणत ललित कष्टाच्या जोरावर मोठ्या उद्योगाची पायाभरणी करत आहे. वृत्तपत्राविषयी ललितच्या मनात वेगळीच जागा आहे. समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असे आपण काहीतरी लिहावे ही त्याची मनोमन इच्छा. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ललितने लिहायला सुरवात केली.

भाषेत शुध्दता नसली तरी त्याची लेखनी सामान्य माणसांना भावली. सामान्यांच्या मनाला भिडली. रोजंदारीवर काम करणार्‍या व्यक्तीपासून ते कलेच्या क्षेत्रात योगदान देणार्‍या प्रत्येक व्यक्तीची दखल ललित घेवू लागला.
आज ललितचा वाढदिवस आहे. माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत हवा.

कोव्हिड सारख्या विषाणूने हे सिध्द करून दाखविले की मनुष्याने किती पैसा कमविला हे महत्वाचे नसून किती माणसे कमविली हे महत्वाचे आहे. चांगल्या वृत्तीने तू कमविलेली ही संपत्ती अफाट आहे. ही संपत्ती प्रत्येकाला मिळतेच असे नाही !


दुसर्‍यांसाठी भरभरून लिहिणार्‍या ललितविषयी काहीतरी लिहिण्याची इच्छा होती. आज वाढदिवसाच्या रूपाने ती पूर्ण झाली.
स्वत:साठी अत्यल्प आणि समाजासाठी सर्वस्व देणार्‍या ललितला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

  • सुदीप हासे
    कार्यकारी संपादक, दैनिक युवावार्ता, संगमनेर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter