Wednesday, October 20, 2021

परमबीर सिंग यांच्यासह २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या हालचाली

मुंबई: खंडणीच्या प्रकरणात पाच वेगवेगळे गुन्हा दाखल असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह अन्य २५ पोलिसांना निलंबित करण्याचा प्रस्ताव राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याला दिला आहे. पांडे यांच्या प्रस्तावानंतर गृहखात्यानं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविषयी सविस्तर माहिती मागवल्याचं सूत्रांकडून समजतं.

‘इंडियन एक्स्प्रेस’नं राज्य सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. संजय पांडे यांनी गृहखात्याकडं पाठवलेल्या यादीत परमबीर सिंग यांच्यासह वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपी असलेले चार उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. गृहखात्यानं या प्रस्तावावर सावध भूमिका घेतली असून निलंबित करावयाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधातील प्रकरणे, त्यात संबंधितांचा असलेला सहभाग या सगळ्याची माहिती पोलिसांकडून मागवली आहे.

‘प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणार नाही. त्यामुळं एखाद्या अधिकाऱ्यावर गुन्हा असेल तर त्यातील त्याची नेमकी भूमिका समजायला हवी. एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असू शकते, मात्र काही जणांचा संंबंध नाममात्र आलेला असू शकतो. पोलीस महासंचालकांनी पाठवलेल्या प्रस्तावात डीजी आणि एसपी रँकचे क्लास वन ऑफिसर आहेत. त्या संदर्भातील फाइल मुख्यमंत्र्यांकडं पाठवावी लागणार आहे. त्यामुळंच आम्ही पोलीस महासंचालकांना सविस्तर तपशील देण्यास सांगितलं आहे. त्यांचं उत्तर आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल,’ असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

एकाच वेळी इतक्या लोकांना निलंबित करण्याच्या निर्णयाचा थेट परिणाम पोलीस दलाची प्रतिमा व पोलिसांच्या मनोधैर्यावर होऊ शकतो. त्यामुळं गृहखातं निर्णय घेताना कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नाही, असं सूत्रांकडून समजतं.

एक प्रतिक्रिया

  1. संगमनेर तालुक्याची विस्तृत माहिती द्यावी. शहरात किती व ग्रामीण भागात कोठे किती रुग्ण ही माहिती रोजचे रोज द्यायला हवी ही विनंती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...