
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व शिक्षक नेते स्व. माधवराव लांडगे सर यांचा श्रीनिवास झाला राज्य कर निरीक्षक… महाराष्ट्र राज्यात अव्वल… मिळविले २४ वे स्थान
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या STI (state Tax Inspector) कर निरिक्षक या पदावर श्रीनिवास माधवराव लांडगे याने महाराष्ट्र राज्यात २४ वे स्थान पटकावले असून स्व. माधवराव लांडगे यांनी पाहिलेले स्वप्न साकार करत त्यांना अभिवादन केले आहे.
माधवराव लांडगे म्हणजे शिक्षकी पेशात करिष्मा असलेले आणि नेहमी हवेहवेसे वाटणारे, चालता चालता माणसे जोडणारे व ते संबंध नेहमी अखंड टिकवून ठेवणारे व्यक्तिमत्व होते. अत्यंत गरीब परीस्थितीतून शिक्षक झालेले माधवराव अनेक क्षेत्रातील मित्र जोडून मैत्री रूपी श्रीमंती त्यांनी जोपासली.

माधवराव लांडगे सर हे एक अजब रसायन होते, सळसळणारा उस्ताह होता, एक अवलिया व्यक्तिमत्व होते. विनोदाचा खळखळणारा झरा होता, उत्तम वक्ता, आदर्श शिक्षक, उत्तम व्यावसायिक उत्तम संघटक, एक समाजभिमुख शिक्षक कसा असावा यांचे ते उत्तम उदाहरण होय. शिक्षकी राजकारणाला न्याय देणारे माधवराव आपल्या पेशाशी कधीच बेइमानी करत नव्हते. ते हाडाचे शिक्षक होते. मनापासून अध्ययन करायचे, वर्ग तयार करणे या कामी त्यांच्याकडे विशेष कौशल्य होते.

माधवरावांचा जनसंपर्क इतका काही दांडगा होता की, संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांमधील शिक्षक त्यांना परिचित असायचे. शिक्षकांच्या राजकीय पटलावर संपूर्ण जिल्हाभर ओळख असलेलं व्यक्तिमत्व होत. अनेक शिक्षकांची कामे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. माधवराव म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व, ते गायनही करायचे, कविताना चाली लाऊन स्वतः गाऊन दाखवायचे. त्यांना चांगल्या प्रकारची मिमिक्री सुद्धा येत होती. वैदुवाडीच्या शाळेवर असताना यांच्या टोनींग मध्येच विदयार्थ्यांबरोबर बोलायचे. त्यामुळे ते आजही वेदुवाडीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रिय आहेत. सर्वानाच माधवरावांबद्दल आपुलकी वाटायची. संगमनेरात गेल्यावर माधवरावांची भेट घेतल्याशिवाय राहावयाचे नाही. नंतर माधव प्राथमीक शिक्षक बँकचे संचालक झाले, पुढे चेरअमन झाले.

प्रासंगिक विनोद करणे ज्यांना सहज सुचायचे, दिसायला रागिट परंतु कठोर वाटणारे माधवराव अत्यंत हळव्या मनाचे मनाचे होते. असा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा, हाडाचा शिक्षक, मित्रांसाठी जिवाला जिव देणारा, विनोदी वृत्तीने गंभीर वातावरणाला हलके फुलके करणारा, शिस्तप्रीय तितकाच कुटुंब वास्तल्य माधवराव अपघातात अचानक सर्वाना सोडून गेले.
स्व. माधवराव सरांना दोन मुले. दोघेही इंजिनियर आहेत. मोठा मुलगा चंद्रशेखर नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत आहे तर श्रीनिवास याची STI (state tax inspector) या पदावर MPSC मार्फत निवड झाली आहे. घरचे माधवरावांना प्रेमाने आण्णा म्हणत. श्रीनिवास हा त्यांचा लाडका. लाडाने ते त्यास बाळा म्हणत, बाळाने काहीतरी करावे उच्चपदस्त व्हावे, अधिकारी व्हावे ही माधवरावांची ईच्छा. तू स्पर्धा परीक्षांची तयारी कर, वेळ आली तर आपण वडापावची गाडी टाकू इथपर्यंत मनोबल वाढवण्याची कला त्यांच्याकडे होती खरं तर आण्णांआण्णांनी बाळाला अधिकारी होतांना पाहिले असते तर आण्णांना फार आनंद झाला असता.
माधवरावांचे बंधू आनंदराव व बाबुराव यांची मुले आज सरकारी, खाजगी नोकरीत कार्यरत आहेत तसेच आपापल्या क्षेत्रात पारंगत आहेत.
