Saturday, September 18, 2021

संगमनेर पोलिसांच्या कारनाम्याची शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ; नवा वाझे जन्म घ्यायच्या आत भ्रष्ट आणि बरबटलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करा

संगमनेर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील पोलीस विभाग सध्या सचिन वाझे प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनला देखील त्याच गोष्टीची किनार आहे. आणि त्याच पार्श्‍वभूमीवर संगमनेर पोलीस ठाण्यात कोणी नवा वाझे जन्म घ्यायच्या आत भ्रष्ट आणि बरबटलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करा आणि पोलीस विभाग व पर्यायाने सरकारची भविष्यात होणारी बदनामी टाळा अशी विनंती संगमनेर शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री व जिल्हा पोलि प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केली.

शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख विकास डमाळे, पप्पू कानकाटे, लखन घोरपडे, प्रथमेश बेल्हेकर, युवासेना शहर प्रमुख अमोल डुकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहराज्यमंत्री ना. शंभूराजे देसाई व पोलीस महानिरीक्षक दोरजे मॅडम, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटिल यांना निवेदन दिले. संगमनेर शहर व परिसरातील अवैध धंद्यांनी गेल्या एक ते दीड वर्षात उन्माद केला असून अवैध कत्तलखाने, वाळू तस्करी, अवैध मद्य विक्री, अवैध गुटखा विक्रीसह मटका-जुगार क्लब, चोरीचा भंगार माल इत्यादी गोरख धंदे सर्रास सुरू आहेत.

त्याबाबत शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांना वारंवार विनंती करून आणि लेखी निवेदन देऊनही ते डोळेझाक करतात. त्यांच्याच विभागातील कर्मचारी अश्या बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांसोबत वारंवार दिसतात असा आरोप शिवसेना पदाधिकारी यांनी पोलिस महानिरीक्षक यांना समक्ष भेटून केला. पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील अधिकार्‍यांनी सर्व हकीकत ऐकून घेवून सर्व पुरावे घेतले व लवकरात लवकर त्वरित कार्यवाहिचे आदेश देण्याची ग्वाही दिली. शिवसैनिकांनी अवैध व्यवसाय करणार्‍या सर्वच व्यावसायिकाचे नावे व ते देणारे हफ्त्याची रक्कम याची संपूर्ण माहिती दिली व सोबत हफ्ते घेणारे देणारे सर्वांची माहिती देवून कार्यवाही करण्याची विनंती केली.

अवैध गुटखा विक्रेत्यांची नावे व पत्ते देऊनही त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही तर उलट त्यांच्याकडून हफ्ते घेवून त्यांना राजेरोसपणे अवैध धंदे करण्याची परवानगी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही दुर्लक्ष केले. हा प्रकार गंभीर असून भविष्यात संगमनेरचे नाव बदमान करणारा ठरू शकतो अशी चिंता अमर कतारी यांनी व्यक्त केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या एका दिव्यांग अधिकार्‍याने गुटखा विक्रेत्यांवर धाड टाकायचे धाडस केले. त्यांनी पूर्वसूचना देऊनही पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोलिसांचे साहाय्य त्यांना दिले तर नाहीच त्याशिवाय जप्त केलेल्या मालावर व विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेने शहरात नवीन वाझे जन्माला आल्याची दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली. माध्यमांमध्येही याबाबत आवाज उठविण्यात आला आहे.

शिवसेना सत्तेत सहभागी असतांना कायदा व सुव्यवस्था पाळणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य आहे म्हणून आम्ही शांत आहोत मात्र न्याय मिळत नसेल तर शिवसेना काय करू शकते हे सर्वांना माहित आहे. तेंव्हा अशा भ्रष्ट मानसिकता असलेल्या खुशमस्करी करणार्‍या अधिकार्‍यांनी वेळीच सावध व्हावे असा इशारा शहरप्रमुख कतारी यांनी दिला आहे. सरकारची आणि पोलीस विभागाची प्रतिमा जपण्यासाठी वेळीच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यांचे कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार तपासता सर्व प्रकरणे समोर येतील. वेळीच कारवाई न झाल्यास संगमनेरमधील नागरिक रस्त्यावर उतरतील असे कतारी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...

हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी

संगमनेर (प्रतिनिधी)हुल्लडबाजी करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणार्‍या हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे...

संगमनेरात 25 बसचे निर्जंतुकीकरण; अ‍ॅन्टी-मायक्रोबायल ट्रिटमेंटमुळे प्रवाशांचा होणार कोरोनापासून बचाव

संगमनेर (संजय आहिरे)कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर...