Wednesday, October 20, 2021

टोल नाक्याविरुद्ध संगमनेरकरानी आवळली वज्रमूठ

बुधवारी हिवरगाव टोलनाक्यावर “आम्ही संगमनेरकरांचे” आंदोलन

Sangamner Toll Plaza

संगमनेर (प्रतिनिधी)
नाशिक-पुणे महामार्गावर उभारण्यात आलेल्या हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर टोल प्रशासनाच्या मनमानीविरुद्ध संगमनेरकरांनी वज्रमूठ आवळली असून आता विनंती निवेदनाऐवजी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही संगमनेरकर या बॅनरखाली बुधवारी सकाळी 10.00 वाजता हिवरगाव पावसा टोल नाक्यावर रास्ता रोको सह तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.


स्थानिकांना टोलमाफी असूनही टोल ठेकेदाराच्या मनमानीमुळे स्थानिकांना टोल भरावा लागतो. फास्ट टॅग असलेल्या स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी दाखवून काही वेळात किंवा दुसर्‍या दिवशी त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे कापले जातात. अनेक वेळा ठरलेल्या टोल रकमेपेक्षा जास्त रक्कम कापली जाते त्यामुळे स्थानिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. याविरुध्द अनेकवेळा बैठका होऊनही टोलप्रशासनाची मनमानी सुरुच आहे. याच्या निषेधार्थ व स्थानिकांना फास्टटॅग विरहीत स्वतंत्र लेन, खड्डेमुक्त रस्ता, स्ट्रीट लाईट, सर्व्हिस रस्ते दुरुस्ती तसेच न झालेले सर्व्हीस रोड आदींची कामे तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी ‘आम्ही संगमनेरकर’ नागरिकांच्या वतीने बुधवार दि. 08 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता हिवरगाव पावसा टोलनाका येथे रस्तारोको व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या टोलणाक्यावर स्थानिकांवर अनेकवेळा दादागिरी केली जाते. त्यांचे मोबाईल, पाकिट हिसकाविले जाते. याठिकाणी टोल कर्मचार्यांऐवजी गुंडांच्या टोळ्या उभ्या केल्याचे अनेकवेळा दिसते. या त्रासासा संगमनेरकर कंटाळले असून निवेदन देऊन, मागण्या मांडून काहीही साध्य होत नाही त्यामुळेआम्ही संगमनेरकरांनी या अन्यायाविरोधात वज्रमूठ आवळली आहे.


पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी असतानाही टोल प्रशासनाकडून स्थानिकांकडून जबरदस्तीने व फसवणूकीने टोल वसूल केला जातो. शासन प्रशासनाच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आणून देऊनही कोणतीही कार्यवाही होत नाही. टोल प्रशासनाकडून वारंवार या नियमाला बगल देऊन उलट स्थानिकांना उर्मट व उध्दट वागणूक देण्यात येते. अनेक वेळा मारहाणही केली जाते.

दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावर या टोलनाक्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत, स्ट्रीट लाईट बंद आहेत, मधोमध मोठमोठे झाडे वाढलेली आहेत, सर्व्हीस रस्त्यांची दुरावस्ता आहे, अनेक ठिकाणी सर्व्हीस रोड केलेले नाहीत असे असतानाही टोल वसूली मात्र जोरात सुरु आहे. अनेकवेळा निवेदन व आंदोलनाचा इशारा देऊन टोल प्रशासनाकडून केवळ वेळकाढूपणा केला जातो. एकीकडे सुविधा नाही, दुसरीकडे स्थानिकांची लूटमार यामुळे हा प्रश्‍न आता संगमनेरकरांच्या अस्मितेचा बनला आहे. या प्रश्‍नाचा कायमस्वरूपी सोक्ष-मोक्ष लावण्यासाठी बुधवारी आम्ही संगमनेरकर नागरिक टोलनाक्यावर एकवटणार आहेत.

टोल प्रशासनाकडून आंदोलनाचा धसका :
टोल प्रश्‍न संगमनेरकरांच्या अस्मितेचा बनला असून टोल प्रशासनाचा मनमानी कारभार हाणून पाडण्याचा निर्धार ‘आम्ही संगमनेरकरांनी’ केला आहे. आता माघार नाही तर टोल प्रशासनाची मनमानी मोडून काढण्याचा निर्धार संगमनेरकरांनी केला आहे. बुधवारच्या या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी होणार असल्याने टोल चालकांनी या आंदोलनाचा धसका घेत महामार्गावरील छोटे मोठे खड्डे बुजिवण्यास सुरूवात केली आहे. मात्र खड्डे बुजविल्याने हे आंदोलन थांबणार नसून सर्व्हिस रोडची दुरावस्था, अपुरी कामे, टोलच्या नावाखाली लूटमार, दादागिरी यासह अनेक प्रश्नांचा तड लावण्यासाठी उद्याचे हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...