संगमनेर उपविभागात पोलिसांनी राबविले ऑल आऊट ऑपरेशन
सराईत गुन्हेगार लवकरच हद्दपार करणार – वाघचाैरे
दारू, सिगारेट, चाेरी, गाैवंश तस्करांवर कारवाई
ऑल आऊट ऑपरेशनमध्ये केलेली कामगिरी
- महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत 07 गुन्हे
- अटक वॉरंट बजावणी- 25
- बेलेबल वॉरंट बजावणी-18
- समन्स बजावणी -122
- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक 07 गुन्हे
- जुगार कायदा अंतर्गत 5 रेड
- गोवंश हत्या बंदी कायद्याअंतर्गत 2 गुन्हे
- नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदे अंतर्गत 76 कारवाया
- महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122/124 अंतर्गत 2 गुन्हे
- ड्रंक अँड ड्राईव्ह 6 गुन्हे
- हिस्ट्री शिटर चेक – 31
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- आगामी कालावधीमध्ये येणारे सण उत्सव शांततेमध्ये पार पडावे त्याप्रमाणे गुन्हेगारांवर एकत्रितरीत्या एकाच वेळी कारवाई करण्याच्या उद्देशाने संगमनेर उपविभागामध्ये काल मंगळवारी (20 जून) रोजी रात्री आठ ते आज बुधवार (21 जून) चे पहाटे दोन वाजेपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीसांच्या वतीने कोंबिंग ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले. सदरच्या ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान समन्स बजावणी, वारंट बजावणी, अटकवारंट मधील आरोपींना अटक करणे, फरार आरोपी अटक करणे, त्यांना चेक करणे, तडीपार गुन्हेगार चेक करणे, अवैध धंद्यांवर कारवाया करणे, त्याचप्रमाणे रात्रग्रस्त दरम्यान संशयितरित्या फिरणार्यांवर कारवाई करणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कारवाया करणे, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, विविध मालमत्तेविषयी गुन्हे उघड करणे आदी बाबींसाठी सदरचे ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले. या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये पोलीसांनी अनेक प्रकारच्या कारवाया केल्या.
पोलीसांनी काल मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास अवैध धंद्याविरूद्ध जोरदार आघाडी उघडली. शहर पोलीसांनी शहरालगत असणार्या रायते वाघापूर रोड येथील हॉटेल लक्ष्मी येथे छापा मारत 180 मीलीच्या 8 बाटल्या (किंमत 560) जप्त केल्या. याप्रकरणी बाबासाहेब सिताराम पानसरे (रा. दत्तनगर, ता. संगमनेर) यांच्या विरूद्ध गुन्हा रजी. नं. 501/2023 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर दुपारी 1.30 च्या सुमारास पोलीसांनी समनापूर रायते बायपबास रोड, निंबाळे चौफुली येथे छापा टाकत 910 रू किंमतीच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या 15 बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी दिपक ओमकार साळुंखे (रा. घुलेवाडी फाटा याच्या विरूद्ध गुन्हा रजि. नं. 502/23 मु. पो. कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान शहर पोलीसांच्या पथकाने मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास तहसील कार्यालयाजवळच असणार्या मोमीनपुरा येथी मोहीद्दीन जैनुद्दीन शेख याच्या टपरीवर छापा मारत 330 रूपये किंमतीचे गोल्ड फ्लॅक कंपनीचे 2 पाकिटे सिगारेट तर 267 रू किंमतीचे फो स्कोयर क्रश कंपनीचे सिगारेट जप्त केले. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा रजी. नं. 503 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सिगारेट व तंबाखू जन्य पदार्थ बंदी कायदा 2003 चे कलम 6 (ब) 24 प्रमाणे दाखल केला आहे. तसेच दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील पेटीट हायस्कूल समोरील एका दुकानावर छापा टाकत 660 रूपयांचे सिगारेट जप्त केले. या प्रकरणी अविनाश नामदेव जगदाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान संगमनेर -देवगाव रोड वरील सिद्धकला कॉलेज समोर राजू शिवाजी कोठवळ यांच्या पानटपरीवर कारवाई करत 216 रूपये किंमतीचे विमल पान मसाला, 545 रूपये किंमतीचे विविध कंपनीचे सिगारेट असा सुमारे 761 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. व सदर आरोपीवर गुन्हा रजी नं. 508/2023 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या कारवाया सुरू असतांना दुपारी 1.30 च्या सुमारास रायते बायपास रोड निंभाळे चौफुली येथे बंडू उमाजी शिंदे (रा. वाघापूर) याला पोलीसांनी हटकले असता व त्याच्याकडे असलेल्या पांढर्या रंगाच्या अॅक्टीव्हा गाडीबाबत चौकशी केली असता त्याने सुरूवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसांनी खाक्या दाखविल्यानंतर त्याने सदर गाडी चोरीची असून आपण ती विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे पोलीसांना सांगितले. यावरून पोलीसांनी बंडू शिंदे याच्या विरूद्ध 505/2023मंगळवारी दिवसभर पोलीसांनी कारवाया केल्यानंतर बुधवारी पहाटे पावने तीनच्या सुमारास शहरातील भारत नगर सुफियान कुरेशी यांच्या वाड्यात पोलीसांनी छापा टाकला. यावेळी या पथकाला 16 गोवंश जनावरे (एक लाख साठ हजार किंमतीची) आढळून आली. या प्रकणी राजिक मुनिर शाहा याच्याविरूद्ध गुन्हा रजि नं. 510/2023, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारीत सन 1995 चे कलम 5, 9 (अ) तसेच प्राण्यांना निर्दयपणे वागणूक प्रतिबंध कायदा कलम 3/11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर 3.30 च्या सुमारास या पथकाने जमजम कॉलनी गल्ली नं.9 या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी गोवंश जातीची 27 वासरे (किंमत 1 लाख 35 हजार) आढळून आली. याप्रकरणी राजिक रज्जाक शेख याच्या विरूद्ध या कलमातील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन यांचे प्रभारी अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी केलेली आहे. यापुढे देखील वेळोवेळी कोंबिंग ऑपरेशन, ऑल आऊट ऑपरेशन राबवून उपविभागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे त्याचप्रमाणे त्यांच्यावरती सक्त प्रतिबंधक कारवाया पोलीस विभागाकडून सातत्याने करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पो. नि. भगवान मथुरे यांनी सांगितले.