Saturday, May 1, 2021

संगमनेरला गरज ऑक्सिजन प्लांट व मोठ्या हॉस्पिटलची ; संगमनेरकरांनो आपणच होऊ आपले रक्षक

OXYGEN

अतिशय हृदयद्रावक तीन अनुभव

 1. रात्री 9.30 वाजता संगमनेरमधील प्रसिद्ध डॉक्टरांचा फोन आला. फोनवर अतिशय निराश स्वरात ते बोलत होते. अतिशय निराश झाले होते. कारण होते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दोन पेशंट ऑक्सीजन अभावी मयत झालेे. त्यांना तडफडून मरतानाबघून व नातेवाईकांचा आक्रोश बघून डॉक्टर अतिशय दुःखी झाले होते. अशा प्रकारचे अत्यंत क्लेशदायी मृत्यू त्यांनी बघीतले नव्हते. प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्याने फोनवरच डॉक्टरांचे समुपदेशन केले. वास्तवातील संघर्षात सैनिक म्हणून लढण्याचे आवाहन केले. मी मात्र स्वतः अतिशय दुःखी झालो.
 2. रात्री बारा वाजता असाच एका हॉस्पीटलमधून डॉक्टरांचा फोन आला. एका महिला पेशंटची ऑक्सीजन लेव्हल कमी होत आहे. कुठे व्हेंटीलेटर मिळतेय का बघा. तातडीने प्रयत्न करा. माझ्याकडे दोन तास पुरेल एवढाच ऑक्सीजन आहे. संपर्काचे अतिशय प्रयत्न करूनही यश मिळाले नाही.
 3. जवळचे नातेवाईकांसाठी एका मोठ्या कोवीड सेंटरच्या डॉक्टरांना ऑक्सीजन बेडसाठी फोन केला. ऑक्सीजन नसल्याने सर्व यंत्रणा ठप्प आहे. ऑक्सीजन लाईन खराब आहे. अ‍ॅडमीट पेशंटला कसे वाचवायचे हे फार मोठे संकट आहे. दोन महिन्यांपासून आम्हाला पुरेशी झोप नाही. वेळेवर जेवण नाही. माझ्या मिस्टरांना (डॉक्टरांना) हाय बीपी आहे. आम्ही कसे पेशंट जगवावेत असा उद्दिग्न सवाल समोरच्या डॉक्टरांनी मला केला. पेशंट दुप्पट आणि ऑक्सिजन निमपट अशी अवस्था सर्वत्र निर्माण झाली आहे.

वरील तीन अनुभव लिहीताना प्रचंड अस्वस्थता आणि भविष्यातील संकटाची भयावह स्थिती दिसत आहे. संपूर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना शासकीय, वैद्यकीय यंत्रणा रस्त्यावर आहे. हॉस्पीटमध्ये बेड नाही, औषधे नाही, ऑक्सीजन नाही अशी अवस्था अत्यंत भेसूर आहे. यानंतर तिसरी लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटना व शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर नंतर आपण सर्वजण कोरोना गेला या भावनेने बिनधास्त झालो आणि कोरोनाने प्रचंड हल्ला करुन लाखोंचे प्राण घेतले. हजारो कुटूंब उध्वस्त झाले.


अशा परिस्थितीत आपण संगमनेरकर तिसर्‍या लाटेचा विचार करुन काही ठोस प्रयत्न करणार आहोत की नाही हा ज्वलंत प्रश्‍न आहे. संगमनेरसाठी काहीच अशक्य नाही हे यापूर्वी अनेक वेळा संगमनेरकरांनी सिध्द केले आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात मोठा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प, प्रशिक्षित मनुष्यबळ व मोठे हॉस्पिटल, अत्यावश्यक औषधांची उपलब्धता या बाबी अत्यंत गरजेच्या आहेत. यापैकी किमान ऑक्सीजन प्लँट उभारला तर रुग्णांचे मृत्यू टाळता येतील. संगमनेर मधील उद्योगपती, दानशूर व्यक्ती, विविध सामाजिक-आर्थिक संस्था, विविध पक्षांचे पदाधिकारी, सरकार व शासकीय अधिकारी यांनी एकविचाराने, समन्वयाने ठरविले तर संगमनेरसाठी मोठे हॉस्पीटल व ऑक्सीजन प्रकल्प उभा राहू शकेल.

तिसरी लाट जुलै-ऑगस्ट मध्ये येण्याची शक्यता गृहीत धरली तर पुढील दोन महिन्यात ऑक्सीजन प्लँट व हॉस्पीटल उभे राहू शकेल. राज्याचे महसूलमंत्री व संगमनेर नेते ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समुह, उद्योगपती आबासाहेब थोरात, उद्योगपती साहेबराव नवले, उद्योजक प्रदीपभाई शाह, उद्योजक बाळासाहेब देशमाने यांच्यासारख्या अनेक दानशूर व सन्माननीय व्यक्तींनी आजच्या अतिशय भयानक आणीबाणीचे प्रसंगी एक विचाराने जनतेला आवाहन केले तर थोड्याच दिवसात काही कोटीत सहाय्यता निधी संगमनेरकर उभा करु शकतील.

सामान्य संगमनेरकरसुध्दा एक दिवसाची मजूरी देऊन या सेवायज्ञात सहभागी होतील. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या संगमनेर महाविद्यालयाचे उभारणीत उद्योगपती, दानशूर व्यक्ती, विडी कामगारांनी व शेतकर्‍यांनी योगदान देऊन उभारणी केली आहे. दानशूर व्यक्ती व नागरिक एकत्र आले तर संगमनेरमध्ये सर्वात मोठे हॉस्पीटल व ऑक्सीजन प्रकल्प उभा राहील्याशिवाय राहणार नाही. आम्ही आवाहन केले आहे. पुढील संयोजन संगमनेरमधील मान्यवर, विद्वान व सेवाभावी व्यक्तींनी केल्यास, निधी उभा राहील्यास त्यासाठीचे शासकीय परवानग्या, जागा आणि देखभाल यासाठी आपले लोकप्रतिनिधी व राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात निश्‍चित सहकार्य करतील अशी खात्री वाटते. दक्षिण नगर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे परीवार दीड कोटीचा आधुनिक ऑक्सीजन प्लँट दहा दिवसात उभारण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण संगमनेर हा एक आपला परीवार आहे. आपल्या आरोग्यासाठी, कोरोनापासून वाचण्यासाठी व सुरक्षित भवितव्यासाठी आपला संगमनेरकर परिवार मागे राहणार नाही अशी खात्री वाटते.

किसन भाऊ हासे, संगमनेर
मो. ९८२२०३९४६०

या लेखाला खालील मान्यवर व्यक्तींनी सकारात्मक अभिप्राय दिले आहेत. दैनिक युवावार्ताच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद.

 1. मा. राजेशजी मालपाणी (मालपाणी उद्योग समुह)
 2. मा. साहेबराव नवले (श्रमिक उद्योग समुह)
 3. मा. प्रदिपभाई शाह (श्री यशोदेव प्रतिष्ठाण)
 4. मा. कैलासजी सोमाणी (राजेंद्र उद्योग समुह)
 5. मा. बाळासाहेब देशमाने (स्वदेश उद्योग समुह)

वाचकांनीही आपल्या भावना कळवाव्यात.

5 प्रतिक्रिया

 1. अतिशय उत्तम अशी संकल्पना आहे..अश्या सामाजिक कार्यासाठी गरीबतला गरीब माणूस सुद्धा त्याच्यापरीने मदत नक्की करीन.. परंतु याची सुरुवात करण्यासाठी कुणीतरी मोठी व्यक्ती पुढे यायला हवी

 2. चला संगमनेरकरांनो…
  उठूया सिध्द होवूया प्राण वायूसाठी !
  असाध्य ते साध्य
  करीती सायास !
  संगमनेर त्यासी म्हणे !

 3. अतिशय उत्तम संकल्पना आहे,यासाठी लवकरात लवकर काही तरी हालचाली केल्या पाहिजे.आणि संगमनेरकर याबाबतीत कुठलीही कमी पडू देणार नाही याची खात्री आहे.आम्ही सर्व संगमनेरकर यात मनापासून सहभागी आहोत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,904चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...