Wednesday, October 20, 2021

रोटरी आय बँकसाठी संगमनेर नगरपरिषद जागा देणार – दुर्गा तांबे ; संगमनेर रोटरी पदग्रहण समारंभ थाटात

संगमनेर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब संगमनेरचा पदग्रहण समारंभ मंगळवार दिनांक २७ रोजी मालपाणी हेल्थ क्लब येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी नुतन अध्यक्ष योगेश गाडे यांनी मावळते अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांचेकडून अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतली. तर सेक्रेटरी म्हणून हृषिकेश मोंढे तर उपाध्यक्षपदी महेश वाकचौरे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गा तांबे, रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद पारिख, सहप्रांतपाल दिलीप मालपाणी उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या की, संगमनेर नगरपालिकेच्या आवारात सुरू असलेल्या रोटरी नेत्र रुग्णालयाने जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे याचा आम्हाला अभिमान आहे. अहमदनगर जिल्ह्यातून गरजू रुग्णांवर तिरळेपणा, मोतीबिंदू या आजारांवर मोफत उपचार करून रोटरीने त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त करून दिली आहे. संगमनेर रोटरीच्या या कामाची जागतिक स्तरावर नोंद घेतली असून या हॉस्पिटलच्या आवारातच आता आय बँक सुद्धा व्हावी जेणेकरून नेत्रदानासारखे मोठे काम संगमनेर मध्ये होईल, यासाठी संगमनेर रोटरी सदस्य सतत प्रयत्नशील आहेत. नगरपालिकेमार्फत शासन स्तरावर या योजनेच्या मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सध्या हा प्रस्ताव मंत्रालयात गेलेल्या असल्यामुळे लवकरच यावर सकारात्मक निर्णय होऊन आय बँक साठी लागणारी जागा नगरपालिका उपलब्ध करून देईल अशी ग्वाही नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी उपस्थितांना दिली.


माजी प्रांतपाल प्रमोद पारिख यांनी संगमनेर रोटरीचे काम खूप सुंदर असून कोव्हीड आपत्तीग्रस्त विधवा महिलांसाठी एक हात मदतीचा या शिलाई मशीन वाटपाच्या प्रकल्पाला संपूर्ण जिल्ह्यातून आम्ही मदत करत आहोत. सर्व भगिनींना शिलाई मशीन मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. रोटरी इंटरनॅशनलतर्फे जास्तीत जास्त शिलाई मशीन आम्ही मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच जागतिक स्तरावर सुरू असलेल्या रोटरीच्या कामाबद्दल माहिती दिली.


आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच समाजातील दानशूर व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्तींनी रोटरी क्लब सारख्या संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करावी असे आवाहन केले. त्यांनी क्लबमध्ये सुरवातीच्या काळात आपण कसा सहभाग नोंदविला होता या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमात सर्व रोटरी सदस्यांनी कोविड संबंधीचे नियम पाळून सहभाग नोंदविला.
यावेळी लातूर येथील मानवता विकास प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय मानव विकास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मावळते अध्यक्ष पवनकुमार वर्मा व श्री श्री रविशंकर विद्यालयाच्या अध्यक्षा स्वाती शाह यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सागर गोपाळे व विश्वनाथ मालाणी यांनी केले तर आभार ऋषिकेश मोंढे यांनी मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...