Saturday, May 1, 2021

संगमनेर मधील दुर्दैवी घटना ; मार्केट यार्डच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग ; संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम सुरू आहे.


याबाबत माहिती अशी की, संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील बाजूला वखार महामंडळाचे गोदाम आहे. या गोदामामध्ये धान्य, कापूस इत्यादी वस्तू साठवलेल्या असतात. आज मंगळवार दि. 27 एप्रिल 2021रोजी संध्याकाळी 9 वाजेच्या दरम्यान या गोदामाला अचानक भीषण आग लागली. आगीचे मोठमोठे लोट बाहेर येऊ लागल्यानंतर येथे एकच धावपळ उडाली. त्यानंतर सांगमनेर साखर कारखाना व नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. आगीची दाहकता खूप मोठी असल्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाजार समितीचे सतीश गुंजाळ यांच्यासह सदस्य व शहरातील इतर पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोदमामध्ये ज्वलनशील वस्तू असल्याने ही आग भडकतच आहे.


आग लागल्याचे समजल्यानंतर येथून शतपावली करणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांच्या मदतीने गर्दी हटविण्यात आले. दरम्यान या आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. विजेच्या शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शहरात प्रथमच इतकी भीषण आग लागली असून या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. आग पाहण्यासाठी येणार्या नागरीकांमुळे आग विझविण्यासाठी अडचण येत आहे.

 • अनेक कार्यकर्ते आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी गेले आहे.
 • आग कमी होऊन गोदामतील ज्वलनशील पदार्थांनी पुन्हा पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला आहे.
 • अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मिळत आहे.
 • तब्बल दोन तासानंतरही आग आटोक्यात आलेली नाहीये.
 • आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
 • गोदाममध्ये कापूस जास्त प्रमाणात असल्याने आग विझण्यास अडचण होत आहे.
 • दरम्यान आग विझविण्याचे काम सुरू असल्याने जवळील परिसराची वीज बंद करण्यात आली आहे.
 • रात्री तीन वाजेपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच.
 • धान्याला आग लागल्याने विझण्यास अडचण.
 • पहाटे सहा वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश.
 • ज्वाला निघत असल्याने सकाळी 8.30 वाजता विझवीन्याचे काम सुरू

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,904चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...