Tuesday, January 18, 2022

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार डॉ.आ.ह.साळूंखे यांना तर डॉ.सुधीर भोंगळे यांना डॉ.आण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जाहीर

संगमनेर ( प्रतिनिधी ) सहकारातील दिपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती निमित्त सहकार, समाजसेवा, पर्यावरण,पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठाच्या स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत,लेखक डॉ.अण्णासाहेब हरि साळूंखे यांना तर कृषी, शिक्षण,साहित्य,व संशोधन या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठीचा डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, लेखक व कृषी तज्ञ डॉ.सुधीर भोंगळे यांना जाहिर झाला आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे अभिवादन कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे,बाजीराव पा खेमनर, सौ दुर्गाताई तांबे, ॲड.माधवराव कानवडे,बाबासाहेब ओहोळ,प्रा बाबा खरात,केशवराव जाधव, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त अभिवादन करताना मान्यवर.

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जयंती महोत्सवानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार वितरण व सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून या निमित्त पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार,समाजसेवा,पर्यावरण,या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ.अण्णासाहेब हरि साळूंखे यांना जाहिर झाला आहे. डॉ.आ.ह.साळूंखे विचारवंत व्याख्याते व गाढे अभ्यासक असून त्यांचे अंधाराचे बुरुज ढासाळतील,एकलव्य,प्राईड ऑफ स्वराज्य, उमाजी राजे नाईक, तुकारामांचा शेतकरी, विद्रोही तुकाराम यांसह ६० पुस्तके प्रकाशित झाले आहे. त्यांना राज्य पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले असून महाराष्ट्रात ४० हजार कि.मी चा प्रवास करुन त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत.

तर कृषी,शिक्षण,साहित्य,व संशोधन या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठीचा डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार,लेखक व कृषी तज्ञ डॉ.सुधीर भोंगळे यांना जाहीर झाला आहे. डॉ. सुधीर भोंगळे यांनी सकाळ,लोकसत्ता,म.टाईम्स,लोकमत,पुढारी यांसह विविध वृत्तपत्रांमध्ये वरिष्ठ पदावर काम केले असून शेतीवर वादळ मळा,विकास वाटा,पाणीदार जलचिंतन यांसह १० पुस्तके तर नुकतेच शरद पवार यांच्यावर नेमकचि बोलणे हे चरित्र ग्रंथण प्रकाशित झाले आहे. शेती, पाणी,सहकार,ऊर्जा अशा मुलभूत विषयांवर देशातील व परदेशातील विद्यापीठांमध्ये त्यांची व्याख्याने झाली आहे. या दोन ही व्यक्तींना कोरोना नंतर विशेष कार्यक्रमात एक लाख रुपये रोख व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी निवड समितीच्या वतीने केली आहे.

या निवड समितीमध्ये कृषीरत्न विजय अण्णा बोऱ्हाडे,आ.डॉ.सुधीर तांबे, उल्हास लाटकर,डॉ.राजीव शिंदे,उत्कर्षा रुपवते,प्रा बाबा खरात,केशवराव जाधव यांचा समावेश आहे.

एक प्रतिक्रिया

  1. पुरस्कारासाठी योग्य व्यक्तिंची निवड करण्यात आली. पुरस्कार देणारे व पुरस्कार प्राप्त दोघांचेही अभिनंदन!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter