रोटरी क्लब संगमनेरचे रक्तदान शिबिर उत्साहात, अभुतपूर्व प्रतिसाद, १०७ दात्यांनी केले रक्तदान

रक्तदान शिबिर

संगमनेर (प्रतिनिधी)
सामाजिक सेवेच्या कार्यात नेहमी अग्रभागी असणार्‍या रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी रोटरी क्लब, रोटरी इनरव्हील क्लब, रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक साहेबराव नवले यांचे शुभहस्ते फित कापून शिबीराची सुरुवात करण्यात आली.


रविवार 3 जुलै 2022 रोजी रोटरी नेत्र रुग्णालय, संगमनेर व साई आशिर्वाद इंडस्ट्रीज, संगमनेर औद्योगिक वसाहत अशा दोन ठिकाणी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी अनुक्रमे 55 व 52 असे एकूण 107 दात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी बोलताना श्री. नवले यांनी रोटरी क्लबतर्फे होत असलेल्या सामाजिक कामांचे कौतुक केले तसेच क्लबतर्फे होणार्‍या पुढील उपक्रमांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी त्यांनी उपस्थित रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला तसेच या रक्तदात्यांचे आभार मानले. रक्तदानाविषयी समाजात असलेल्या गैरसमजांबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.


यावेळी रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांसाठी विमा विकास अधिकारी रो. रविंद्र पवार यांचेतर्फे रु. 1 लाखाचा अपघात विमा संरक्षण व मेहता इन्व्हेस्टमेंटचे संचालक रो. मयुर मेहता याचेतर्फे डि-मँट अकाऊंट ब्रोकरेज फ्री ओपन करून देण्याची मोफत सुविधा देण्यात आली होती. उपक्रम यशस्वीतेसाठी क्लब अध्यक्ष ऋषीकेश मोढें, सेक्रेटरी आनंद हासे, खजिनदार विश्‍वनाथ मालाणी, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, प्रकल्प प्रमुख डॉ. प्रमोद राजुस्कर, प्रकल्प समन्वयक डॉ. विकास करंजेकर, डॉ. विनायक नागरे, रो. संदिप फंटागरे इनरव्हीलच्या अध्यक्षा वृषाली कडलग, सेक्रेटरी ज्योती पलोड, खजिनदार सुनिता गाडे यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रसंगी सर्व सहभागी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख