महसूलकडून वाळू तस्करांवर पुन्हा धडक कारवाई

वाळू तस्करांवर कारवाई

जीप, पिकअप, ॲपेरिक्षासह एक रिक्षा जप्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अवैध वाळू तस्करांनी प्रवरा नदीला पोखरून पोखरून नदीचे वाळवंट करून ठेवले आहे. प्रवरा- म्हाळुंगी नदीला वाळू उपश्याचे केंद्र बनविले आहे. अवैध व बेसूमार वाळू उपश्यामुळे या नद्यांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे. याबाबत नागरीक व पर्यावरण प्रेमींकडून विविध तक्रारी महसूल विभागाला मिळाल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसिलदार अमोल निकम यांच्या नेतृत्त्वाखाली महसूल पथकाने तालुक्यातील मंगळापूर, राजापूर, कासारवाडी, खांडगाव परिसरात धडक कारवाई करत वाळू तस्करांची धरपकड केली. यावेळी एक जीप, दोन पिकअप, अ‍ॅपेरिक्षा व एक प्रवासी रिक्षा ताब्यात घेण्यात आली. तसेच पकडलेला वाळूसाठाही जप्त करण्यात आला.


महसूल मंत्री व महसूल विभागाने अवैध गौण खनिज उत्खननावर कठोर निर्बंध आणल्यानंतर ट्रॅक्टर, ढंपर, पिकअप, ट्रक, हायवा, जे.सी.बी. यातून होणारी अवैध वाहतूक व उपसा बंद करण्यात आला होता. मात्र या वाळू तस्करांनी, रिक्षा, कार, जीप, अ‍ॅपेरिक्षा, मालवाहू पिकअप यांच्या माध्यमातून वाळू उपसा व चोरटी वाहतूक सुरुच ठेवली आहे. मात्र आता महसूल विभाग सक्रिय झाला असून नदीपात्रात कुठेही अवैध वाळू उपसा सुरू असल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे. शहरा लगत असणार्‍या गंगामाई घाटाला वाळू उपश्याचे केंद्र बसविल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी महसूल विभागाने वाळू तस्करांच्या अड्यावर छापे टाकून त्यांची वाहने जप्त केली व वाळू साठेही नष्ट केले होते. या तस्करांनी नदीपात्रात मोठमोठे खड्डे केल्याने हे खड्डे मृत्यूचे सापळे बनले आहे. त्यामुळे या अवैध वाळू उपशावर निर्बंध लावावे अशी मागणी वारंवार महसूल व पोलीस विभागाकडे केली जात होती.

दरम्यान तहसिलदार अमोल निकम यांनी आपल्या पथकासह तालुक्यातील मंगळापूर येथे नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणारी जीप ताब्यात घेतली. पुढे राजापूर रस्त्यावर या पथकाला शंका आल्याने त्यांनी एका पिकअपची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आल्याने ही पिकअप ताब्यात घेण्यात आली. कासारवाडी शिवारात देखील अवैध वाळू उपश्याची माहिती मिळाल्याने या पथकाने छापा मारून एक अ‍ॅपेरिक्षा ताब्यात घेतली. तसेच खांडगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा आणखी एक पिकअप ताब्यात घेण्यात आला. तर संगमनेर शहरात अवैध पध्दतीने रिक्षातून अवैध वाळू वाहतूक करीत असताना आढळून आल्यान या पथकाने ही रिक्षा ताब्यात घेतली.
प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार तळेकर, तलाठी तोरणे आप्पा, नायब तहसीलदार कडनोर, शेख अप्पा, संग्राम देशमुख, गरवाल अप्पा, र यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.


महसूल विभागाने या अगोदरही वाळू तस्करांच्या अनेक वाहने जप्त करुन तस्करांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच तीन वाळू तस्करांना हद्दपार करण्यात आले आहे. अनेकांवर गुन्हे दाखल असून जप्त करण्यात आलेली वाहने लवकरच स्क्रॅप करुन त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख