संगमनेरच्या ऐतिहासिक हनुमान विजय रथाचे नूतनीकरण

नवा रथ ठरतोय अधिक मनमोहक

शंभर वर्षाहून अधिक परंपरा

स्री शक्तीचे प्रतीक

युवावार्ता प्रतिनिधी

संगमनेर- संगमनेरचे ग्राम दैवत असलेले चंद्रशेखर चौकातील मोठे मारुती मंदिरातील शंभर वर्षांहून जास्त काळापासून हनुमान जयंतीच्या दिवशी या मंदिराची रथोत्सवाची परंपरा आहे. दर वर्षी निघना-या या रथाचे काल (दि २२) हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हनजेच गुढ़ीपाडव्याच्या दिवशी प्रसिद्ध सनदी लेखापाल आणि विजयनागरी पतसंस्थेचे चेअरमन .पराग सराफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सन १९२७ ते १९२९ ब्रिटिशांनी या रथोत्सवावर धार्मिक तणावाचे कारण सांगून बंदी घातली होती. मात्र १९२९ साली संगमनेरच्या महिला रणरागिणींनी ब्रिटिशांची बंदी झुगारत त्यांच्याशी संघर्ष करत रथाचा ताबा घेऊन रथ गावभर मिरवून आणला आणि ब्रिटिश सरकारला या मातृशक्तीसमोर झुकावे लागले.तेव्हापासून आजपर्यंत हनुमान जयंतीच्या दिवशी रथ ओढायचा मान महिलांना असतो.


साधारण १९०७ च्या सुमारास संगमनेर येथील प्रसिद्ध कलाकार सुंदर खरे मिस्त्री यांच्या कल्पकतेतून आणि कलाकारीतून संपूर्ण भक्कम सागवान, भव्यदिव्य आणि मनमोहक असा हा रथ साकार करण्यात आला होता. १०० वर्षे उलटून गेली तरी या रथाचा साचा आणि सांगाडा आजही अतिशय उत्तम स्थितीत आहे. १९९२ साली रथाच्या साच्याचे काम भास्कर मिस्त्री यांनी केले होते.


श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीने या वर्षी रथाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि नूतनीकरणाचे करताना ज्या काही छोट्या छोट्या तांत्रिक त्रुटी आठलल्या त्यात रथाचा मुख्य दांडा ज्याच्या साहाय्याने रथ वळवला जातो, शिवाय रथाचा कळस, बाजूची नक्षी जी रथाच्या सौंदर्यात भर टाकते अश्या ठिकाणी कामाची विशेष गरज भासली. त्याकारणाने संगमनेरचे प्रसिद्ध आर्किटेक्ट विशाल काळे यांनी या कामात लक्ष घालून कुशल कारागीर शोधले आणि रथाचे काम मागील वर्षी नोव्हेम्बर मध्ये सुरू झाले होते आणि असे किचकट असनारे काम तब्बल ४ महिन्या नंतर मार्च २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण झाले.
हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी रथाचे अनावरण करून रथ मारुतीरायच्या चरणी अर्पण करायचा निर्णय उत्सव समितीने घेतला आणि त्याप्रमाणे काल गुढीपाडव्याच्या शुभदिनी अतिशय दिमाखदार सोहळा श्रीराम मंदिर प्रांगणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध सनदी लेखापाल आणि विजयनागरी पतसंस्थेचे चेअरमन पराग सराफ, तसेच प्रसिद्ध उद्योजक आणि रा.स्व.संघाचे माजी तालुका संघचालक अशोकराव सराफ आणि प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रथाची डागडूजी करण्यासाठी आवश्यक असना-या आर्थिक ख़र्चाचे नियोजन श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई आणि उपाध्यक्ष कमलाकर भालेकर यांनी करुण जे देनगीदार आहेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते आभार रुपी सत्कार करण्यात आला. या कामी आर्थिक मदत करनारे विजयनागरी पतसंस्था, सर्वोदय नागरी पतसंस्था, महेशनागरी पतसंस्था, शारदा नागरी पतसंस्था, साई सहस्त्रार्जुन पतसंस्था, संगमनेर मर्चंट्स बँक, स्वामी समर्थ परिवार, बाजारपेठ मित्र मंडळ आदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच वैयक्तिक मदत करनारे सतिश दुर्गुडे, विरेश आडेप, कैलास खांबेकर, समीर कर्वे(लंडन), श्रीरंग भालेराव, दिलीप पडवळ यांचा सत्कार करण्यात आला. याच सोबत रथाचे काम आणि वर्षभर रथ ज्या ठिकाणी उभा असतो त्या शेडच्या कामासाठी वेळेची आणि आपल्या कौशल्यांची विनामूल्य उपलब्धता करून देणाऱ्या मान्यवरांचे ही सत्कार करण्यात आले.


रथाची कल्पलता आणि त्या कामासाठी कामगार पुरवणारे विशाल काळे, उत्सव समितीचा वार्षिक अहवाल तसेच रथावरच्या मूर्तीचे रंगकाम करणारेसुनील मादास, फॅब्रिकेशनचे काम करणारे लक्ष्मीकांत दसरे, ऋषिकेश मोंढे, रथावरची पितळी नावे बनवणारेमुकेश म्हाळणकर, अक्रेलीक नेमप्लेटचे काम करणारेसंजय रहाणे, अल्युमिनियमच्या दोन उंच शिड्या दान करणारे भडांगे बंधू, नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी अरविंद गुजर, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी साहित्य उपलब्ध करून देणारे संदीप मरडे, ट्रस्टच्या ऑडिटचे काम बघणारे रमाकांत वेडे यांचा देखील सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा परिचय अक्षय थोरात, प्रास्ताविक कमलाकर भालेकर, कार्यक्रमाचे निवेदन वरद बागुल यांनी तर आभार श्रीराम गणपुले मानले.
हां कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्सव समितीचे कार्यकर्ते गिरीश देशपांडे, विनय गुणे, शामसुंदर जोशी, योगराजसिंग परदेशी, विनायक तांबे, योगेश मांगलकर, राम वामन, सर्वेश देशपांडे, प्रतीक जगताप, शुभम लहामगे, अनिकेत चांगले, अजित खेंगले, चेतन तारे, विलास परदेशी यांनी विशेष प्रयत्न केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख