Monday, July 19, 2021

राजूर पोलीसांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान; गुन्ह्याचा जलद गतीने तपास केल्याने कौतुक

राजूर (विलास तुपे )
राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार, पोलीस हवालदार नेहे, पोलीस नाईक मुंढे, पोलीस अमलदार अशोक गाढे, प्रवीण थोरात, अशोक काळे, दिलीप डगळे, मनोहर मोरे, विजय फटांगरे , राकेश मुलाने, पांडुरंग पटेकर या टीमने गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून 2 दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

त्या बद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी राजूर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाचा सत्कार केला. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे उपस्थित होत्या. पेंडसेत येथील वृध्द महिलेच्या डोक्यात दगड मारून वृध्द महिलेला ठार मारले होते तसेच आरोपी हा जंगलात जाऊन लपून बसला होता. त्यास राजूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोवीस तासात पकडले.

तसेच खडकी येथे झालेल्या भांडणातून खुन झाला होता. सदर आरोपींना चार तासातच शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे या कारवाई बद्दल कौतुक केले आहे. तसेच विविध गुन्ह्यांचा तातडीने तपास लावल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दखल घेत नगर येथे या टीमला बोलून घेत सर्व राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांचे कामगिरीचे कौतुक केले. या सन्मानामुळे राजूर परिसरातून सा. पो. नि नरेंद्र साबळे यांचा टीमवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

खांडगांव ते पेमगिरी रस्त्याची दुरावस्था, प्रशासनही निद्रिस्त? ; लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा खड्डयामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून प्रवाश्यांना त्याचा फटका बसत आहे....

राजूर पोलीसांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान; गुन्ह्याचा जलद गतीने तपास केल्याने कौतुक

राजूर (विलास तुपे )राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,...

नानासाहेब वर्पे उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित ; उद्योग व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या विविध मान्यवरांचा गौरव

संगमनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने यशस्वी उद्योजकांना दरवर्षी भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात; पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच...

दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढीस – महसूल मंत्री नामदार थोरात ; अमृतवाहिनी बँकेच्या वतीने क-हे घाटात वृक्षारोपण

संगमनेर (प्रतिनिधी)ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव उपाय आहे. मागील दोन वर्षापासून आलेल्या कोरोना संकटात प्राणवायूचे...