Tuesday, January 18, 2022

महाराष्ट्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प राजस्थानने स्वीकारला ; ई-पीक पाहणी प्रकल्प ई-गिरदावरी म्हणून राबविण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था)
राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राजस्थान राज्य शासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे महसूल मंत्री रामलाल जाट यांनी महाराष्ट्राची ई-पीक पाहणी प्रकल्प ई-गिरदावरी म्हणून स्वीकारली असल्याची घोषणा केली असल्याची माहिती महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.


याबाबत अधिक माहिती देताना ना.थोरात यांनी सांगितले की, महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या मदतीने ई-पीक पाहणी प्रकल्प विकसित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2021 पासून हा प्रकल्प राज्यव्यापी लागू केलेला आहे.


हा प्रकल्प राज्यातील महसूल आणि कृषी विभागासाठी महत्वाचा बदल करणारा प्रकल्प ठरणार आहे. राजस्थान प्रमाणे देशातील इतर राज्ये ही हा प्रकल्प स्वीकारुन लवकरच हा प्रकल्प देशव्यापी राबवला जाईल, असा मला विश्‍वास आहे. याबाबत प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी सांगितले की, शेतकरी घटकांना सक्षम करणार्‍या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी राजस्थान राज्याचे जमाबंदी आयुक्त महेंद्र परख, भिलवाडा जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते, एनआयसीचे तांत्रिक संचालक अरुण माथुर व श्री. मीना यांचे पथक महाराष्ट्र राज्याच्या अभ्यास दौर्‍यावर आले होते.

त्यांनी पुणे जिल्ह्यातील येथे भेट देऊन पाहणी केली. शेतकर्‍यांशी संवाद साधला. प्रकल्प राबविण्यासाठी काय तांत्रिक उपाय योजना कराव्या लागल्या यांची माहिती घेतली. राजस्थानच्या पथकाने महाराष्ट्राच्या डिजिटल सातबाराच्या म्हणजेच ई फेरफार प्रकल्पाचा देखील अभ्यास केला. महाराष्ट्राची ऑनलाईन ई फेरफार प्रणाली देखील राजस्थान मध्ये लागू करण्याचा मनोदय व्यक्त केला, असे श्री. जगताप यांनी सांगितले.

काय आहे ई-पीक पाहणी प्रकल्प ?
महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई- पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी. आतापर्यंत 90 लाखांहून अधिक शेतकर्‍यांनी ई- पीक पवर नोंदणी. ई-पीक पाहणी हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा. जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उतार्‍यांवर पिकांची नोंद करण्याची पध्दत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य या पीक नोंदणीच्या आधारे शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter