Thursday, July 22, 2021

प्रा. प्रमोदा पात्रो यांना मॅथेमॅटिक्स विषयात पीएच. डी. प्रदान 2 पेटंट प्रकाशित करणार्‍या डॉ. पात्रो यांना यंग रिसर्चर पारितोषिक


संगमनेर (प्रतिनिधी)- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिअनिरिंग सायन्स विभागातील प्रा. प्रमोदा पात्रो यांना कोनेरू लक्ष्मैया शैक्षणिक प्रतिष्ठान , विजयवाडा (आंध्र प्रदेश) विद्यापीठाने मॅथेमॅटिक्स विषयात पीएच.डी प्रदान केली.प्रा. प्रमोदा यांनी सम स्टडीज ऑन फझी ऑप्टिमायझेशन अँड मशीन लर्निंग टेक्नीक फॉर क्लासीफिकेशन या विषयावर प्रबंध सादर केला.गणित विषयाच्या अभ्यासात वर्गीकरणासाठी ऑप्टिमायझेशन आणि मशीन लर्निंग तंत्रांवर काही संशोधन करण्यासाठी सुलभ प्रणालीची रचना त्यांनी शोधली. अबलोन शेलफिश हा माशाचा एक प्रकार आहे आणि त्याचे कवच दागिन्यांमध्ये लोकप्रिय आहेत. या कामात डॉ. पात्रो यांनी अबलोनच्या वयाचा अंदाज लावण्याच्या समस्येवर विचार केला. हा अभ्यास एक वर्गीकरण समस्या आहे ज्याचा हेतू अबलोणच्या शारीरिक वैशिष्ट्यांचा वापर करून त्याच्या वयाच्या श्रेणीचा अंदाज लावण्याचा आहे. ऑप्टिमायझेशन आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरुन अबलोनेचे वय शोधण्यासाठी भौतिक वैशिष्ट्यांचा वापर कसा करावा ह्याचे संशोधन प्रा. पात्रो यांनी केले.

त्यांना डॉ. जी. सुरेश कुमार (सहयोगी प्राध्यापक, गणित विभाग, कोनेरू लक्ष्मैया शैक्षणिक प्रतिष्ठान , विजयवाडा), व डॉ. कृष्णा कुमार, (अप्लाइड सायन्स विभाग, एम.आय.टी. एडीटी विद्यापीठ, पुणे ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ह्या संशोधनाचे प्रबंध विविध आंतरराष्ट्रीय जर्नल एल्सेव्हियर (जर्नल ऑफ कॉम्प्युटर आणि इंफोरामेषण सायन्स) व कॉन्फरन्स
मध्ये त्यांनी प्रकाशित केले आहेत. त्यांच्या एल्सेव्हियर प्रकाशनामुळे, त्यांना बंगळुरु, इंडिया इनस्क (इन्स्टिट्यूट ऑफस्कॉलर) कडून 2020 चे यंग रिसर्चर अवॉर्ड मिळाला. तसेच प्रा. पात्रो यांच्या नावावर 2 पेटंट मल्टीलेयर्ड फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्क आणि अस्पष्ट लॉजिक वापरुन प्रभावी ग्राहक गुंतवणूकीची पद्धत आणि अस्पष्ट संज्ञा ओळखण्यासाठी डेटा
विभाजन आणि पॅरामीटर शिक्षणासाठी तंत्रिका नेटवर्क आधारित पद्धत या प्रबंधावर पेंटट प्रकाशित झाले आहेत. डॉ. पात्रो यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे, विश्‍वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही.पी. वाघे, प्रा. ए. आर. तांबे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून रोखले 70 बालविवाह ; कायदे कठोर व्हावेत मोठी चळवळ उभी करणार

संगमनेर (प्रतिनिधी)सरकारने कायदा करून व जनजागरण करूनही अजूनही अनेक ठिकाणी बालविवाह केले जातात. कोरोना काळात काही निर्बंध...

प्रा. प्रमोदा पात्रो यांना मॅथेमॅटिक्स विषयात पीएच. डी. प्रदान 2 पेटंट प्रकाशित करणार्‍या डॉ. पात्रो यांना यंग रिसर्चर पारितोषिक

संगमनेर (प्रतिनिधी)- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिअनिरिंग सायन्स विभागातील प्रा. प्रमोदा पात्रो यांना कोनेरू लक्ष्मैया शैक्षणिक प्रतिष्ठान ,...

खांडगांव ते पेमगिरी रस्त्याची दुरावस्था, प्रशासनही निद्रिस्त? ; लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा खड्डयामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून प्रवाश्यांना त्याचा फटका बसत आहे....

राजूर पोलीसांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान; गुन्ह्याचा जलद गतीने तपास केल्याने कौतुक

राजूर (विलास तुपे )राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,...

नानासाहेब वर्पे उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित ; उद्योग व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या विविध मान्यवरांचा गौरव

संगमनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने यशस्वी उद्योजकांना दरवर्षी भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी...