आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांची उपस्थितीत
युवावार्ता (प्रतिनिधी)
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व मा. महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. जाणता राजा मैदान येथे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेशाही बाणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे गोरगरीब व सर्वसामान्यांचे नेते असून महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून लोकप्रिय आहेत. महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक सलग आठ वेळा निवडून येत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण ,पाटबंधारे ,रोजगार हमी योजना, खारजमीन, राजशिष्टाचार, जलसंधारण या विभागांची खाती सांभाळली आहेत. महसूल विभागाला हायटेक बनवताना लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून शालेय शिक्षण विभाग सांभाळताना बेस्ट ऑफ फाईव्ह चा निर्णय तर कृषी विभागात एक लाख शेततळ्यांची निर्मिती त्यांनी केली आहे .याचबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे ते सदस्य असून महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करताना राज्यात काँग्रेसला पुन्हा भरारी दिली आहे.
याचबरोबर उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण करून कालव्यांची कामे अहोरात्र सुरू केली. अशा या लोकप्रिय नेत्याचा वाढदिवस संपूर्ण राज्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा होत असून संगमनेर मध्येही 7 फेब्रुवारी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गतच रविवारी सायंकाळी 7.30 वा. जाणता राजा मैदान येथे शिंदेशाही बाणा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रम होणार आहे .यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे ,मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांची उपस्थिती राहून अनमोल गीतांचा नाजराणा हा कार्यक्रम होणार आहे .जाणता राजा मैदानावर या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू असून या कार्यक्रमाला संगमनेर, अकोले व जिल्ह्यातील नागरिक व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळ यांनी केले आहे..