Tuesday, January 18, 2022

पाकची घुसखोरी उधळली!! : गुजरातच्या समुद्रात बोट पकडली ; ४०० कोटींचे ड्रग्ज जप्त

अहमदाबाद: गुजरातच्या समुद्रात भारतीय हद्दीत एक पाकिस्तानी मच्छिमार बोट ताब्यात घेण्यात आली आहे. या बोटीतून ४०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. एटीएस आणि तटरक्षक दलाने हि मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची भारतीय हद्दीतील गुसखोरी उधळवून लावण्यात यश आले आहे.


रविवारी रात्री गुजरातच्या समुद्रात ही कारवाई करण्यात आली. गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ही बोट ताब्यात घेण्यात आली. या बोटीतून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे ४०० कोटी रुपये असल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बोटीत सहा खलाशी होते. त्या सर्वांना अटक करण्यात आले आहे. ही बोट कच्छमधील जखाऊ बंदरात आणण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे. याबाबत ‘ पीआरओ डीफेन्स गुजरात’ या अधिकृत ट्वीटर हँडवरून तपशील देण्यात आला आहे. अल हुसैनी असे या बोटीचे नाव असून ही मच्छिमार बोट पाकिस्तानातून भारतीय सागरी हद्दीत आली असता कारवाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, गुजरातमधील मुंद्रा पोर्ट येथे सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या एका कारवाईत २१ हजार कोटी रुपये इतक्या किमतीचे तब्बल ३ हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. मुंद्रा पोर्ट येथे डीआरआयच्या पथकाने ही कारवाई केली होती. इराणमधील अब्बास बंदरातून आलेल्या कंटेनर्सची तपासणी केली असता हे तीन हजार किलो ड्रग्ज आढळून आले होते. कंटेनरमध्ये टॅल्कम पावडर असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला गेला होता. हे ड्रग्ज अफगाणिस्तानातून पाठवण्यात आल्याचे व इराण, पाकिस्तान मार्गे गुजरातमध्ये पोहचवण्यात आल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानी मच्छिमार बोटीत ड्रग्ज आढळल्याने खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter