जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन

वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन

लायन्स सफायर, माधवबाग आणि निमा यांचा अभिनव उपक्रम

युवावार्ता (प्रतिनिधी)

संगमनेर – – दि. 7 एप्रिल 2023 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त लायन्स क्लब संगमनेर सफायर, माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, नॅशनल इन्ट्रीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वॉकेथॉन (चालण्याची स्पर्धा) 2023 याचे आयोजन केल्याचे एमजेएफ ला. गिरीश मालपाणी, ला. श्रीनिवास भंडारी, सफायर अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी यांनी सांगितले आहे. आयुर्वेद विज्ञानानुसार दररोज 2 ते 3 किलोमीटर चालल्याने मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते. 10000 पावले चालल्याने रक्ताची साखरेची पातळी नियंत्रित राहते. तरी या अभिनव उपक्रमात संगमनेरमधील सर्वच वयोगटातील व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख डॉ. अमोल वालझाडे, सुदीप हासे, डॉ. विशाल ताम्हाणे, डॉ. सुशांत गिरी, डॉ. कल्पिता वालझाडे, डॉ. विनायक नागरे, डॉ. शरद गुंजाळ यांनी केले आहे.


सहा गटांमध्ये भरघोस बक्षिसे असून वय वर्ष 45 ते 55, वय वर्ष 56 ते 65, वय वर्ष 66 ते 75 या वयोगटातील पहिल्या तीन पुरुष आणि महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास रोख रु. 1100, मेडल आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रोख रु. 700, मेडल आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास रोख रु. 500, मेडल आणि प्रशस्तीपत्रक असे बक्षिसाचे स्वरूप आहे. याव्यतिरिक्त 75 वर्षावरील व्यक्तींसाठी विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी होणार्‍या प्रत्येक स्पर्धकास कॅप, एनर्जी ड्रिंक आणि मायक्रोपॅथ लॅब च्या वतीने रक्तातील साखरेची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.तीन किलोमीटर मध्ये चालण्याच्या या स्पर्धेत मालपाणी लॉन्स, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नवघरगल्ली, मेनरोड, राजस्थान चौक, अशोक चौक, बस स्टँड, मालपाणी लॉन्स असे मार्गक्रमण असणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी दि. 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता नाव नोंदणीसाठी मालपाणी लॉन्स येथे उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोफत प्रवेश असलेल्या या चालण्याच्या स्पर्धेत भरघोस रोख पारितोषिके, सहभाग प्रमाणपत्र, कॅप, एनर्जी ड्रिंक, रक्तातील साखरेचे प्रमाण चाचणी आदी सुविधा असून या स्पर्धेचा प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख