वृत्तपत्रासमोरील आव्हाने या विषयावर रविवारी प्रा. डॉ. धारूरकर यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

प्रा. डॉ. धारूरकर

संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई संस्थेचा उपक्रम
संगमनेर (प्रतिनिधी)
सध्या सुरु असलेल्या घडामोडी आणि त्यामुळे परिपूर्ण वृत्तपत्रांसमोर येणारी आव्हाने या विषयी पत्रकार व पत्रकार क्षेत्रात काम करु इच्छिणार्‍या व्यक्तींसाठी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेच्या वतीने रविवार दि. 3 जूलै 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता ज्येष्ठ वक्ते, मराठवाडा विद्यापीठाचे माजी वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी दिली.


प्रा.डॉ. वि. ल. धारुरकर यांनी पत्रकारिता विषयावर अनेक व्याख्याने या अगोदर दिलेली आहेत. डॉ. धारुरक हे एम. ए. इतिहास, बीजे, पीएचडी (मराठवाडा विद्यापीठ) आहेत. त्यांनी नाशिक येथील गोखले शिक्षण संस्थेच्या बिटको कॉलेज येथे इतिहासाचे अध्यापन केलेले आहे. तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग संशोधन तंत्र साहाय्यक म्हणून नगर जिल्ह्यात दायमाबाद येथील उत्खननात सहभाग घेतला आहे. धुळे जिल्ह्यात वरसूस येथे सिंधू संस्कृतीच्या अवशेषांचा शोध घेण्यात त्यांचा सहभाग आहे.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वृत्तपत्रविद्या विभागात अधिव्याख्याता व विभाग प्रमुख, मराठवाडा विद्यापीठ, कोल्हापूर येथे वृत्तपत्रविद्या विभाग प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम पाहिलेले आहे. यूजीसीचे एमिरेटस प्रोफ़ेसर म्हणून ते राहिले आहे. वृत्तपत्रविद्या व जनसंवाद या विषयावरील त्यांची 27 पुस्तकं प्रकाशित.


त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रं, परिषदांमधून सहभाग घेतला आहे. यूजीसी यंग सायन्टिस्ट अवार्ड व मिडिया एजुकेटर अवॉर्ड आदी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेतील विद्यार्थी घडलेले आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी पत्रकारितेत डॉक्टरेट देखील मिळविलेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई संस्थेच्या ऑनलाईन पत्रकारिता प्रशिक्षण शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी भुमिका निभावलेली आहे. परिपूर्ण वृत्तपत्रांसमोर अनेक आव्हाणे, अडचणी नेहमी येत असतात त्या अडचणींचा सामना करुन पुढे जाणे गरजेचे असते. पत्रकारिता करताना येणार्‍या अडचणी, आव्हाने आणि त्यांच्यावर कशी मात करायची याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन पध्दतीने झूम अ‍ॅपच्या मदतीने हे व्याख्यान होणार आहे. तरी सदर व्याख्यानास पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्‍या व पत्रकारितेमध्ये काम करु इच्छिणार्‍या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे असे आवाहन संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य अध्यक्ष किसन भाऊ हासे, राज्य समन्वयक नरेंद्र लचके, अहमदनगर जिल्हाध्यक्ष मनोज आगे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Join Zoom Meeting


https://us05web.zoom.us/j/83265551281?pwd=SUl6dTdRWXc2WVFiTXRjYlpTL2pEZz09

Meeting ID: 832 6555 1281
Passcode: spssm123

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख