Thursday, June 17, 2021

यापुढे बसस्थानक परिसराचे विदृपीकरण नको – प्रांत

संगमनेर (प्रतिनिधी)
महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी स्वत:पुढाकार घेत बसस्थानक आवारातील फ्लेक्स व बेशिस्त पार्किंग त्वरीत काढण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्या होत्या. तसेच याबाबत नियमावली तयार करण्याचे आदेश महसूल, पोलिस, नगरपालिका व बसस्थानक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत याबाबत नियमावली तयार करण्यात आली असून यापुढे बसस्थानक परिसरात कुणालाही फ्लेक्स लावण्यात परवानगी देऊ नये, बसस्थानकाची पे पार्कींग व्यव्सथा सुरू करावी, बसस्थानक स्वच्छतेसाठी अगार प्रमुखांनी व्यवस्था करावी यासह अनेक सुचना व आदेश प्रांताधिकार्‍यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिले.


या बैठकीला तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख, पालिकेचे अतिमण विभागाचे अभियंता, बसस्थानक विकासाचे आर.एम.कातोरे, आगार नियंत्रक उपस्थित होते. येथील सुसज्ज बसस्थानक संगमनरेचे वैभव आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बेशिस्तपणे लागणारे फ्लेक्स, अस्थव्यस्थ पार्कींग , घाणीचे साम्राज्य यामुळे अल्पावधीतच या वैभवाला दृष्ट लागली. वाढत्या विदृपीकरणामुळे संतप्त झालेल्या महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरातांनी महसूल, नगरपालीका, परिवहन विभाग यांच्या अधिकार्‍यांची खरडपट्टी काढत येथील अतिक्रमणावर कारवाई करण्याची व वाहन चालकांना शिस्त लावण्याची खबरदारी घ्यावी अशी सुचना केली होती. या पार्श्‍वभुमीवर प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकार्‍यांनी येथील अतिक्रमण, स्वच्छता, पोष्टरबाजी याबाबत महत्त्वाच्या सुचना केल्या. कारवाईसाठी पोलिसांची मदत घ्या. मात्र यापुढे बसस्थानकाचे विदृपीकरण होणार नाही. याची काळजी घ्या अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या. याबाबत लवकरच कारवाई केली जाईल असे अश्‍वासन यावेळी उपस्थिथ अधिकार्‍यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कोरोना : संगमनेरकरांना मोठा दिलासा; आज गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या

संगमनेर (प्रतिनिधी)कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने संगमनेरकरांना हैरान केले होते. कोरोनाची हि लाट थांबविण्यासाठी नागरिक व प्रशासनाने अनेक प्रयत्न...

वाळु तस्करांविरोधात खांडगाव ग्रामस्थ उतरले नदीपात्रात ; वाळू तस्करी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी उखडले रस्ते; संगमनेरकरही छेडणार आंदोलन

खांडगाव (प्रतिनिधी)तालुक्यातील खांडगाव शिवारात प्रवरा नदीपात्रातून राजरोसपणे वाळुचा बेसुमार उपसा केला जात आहे. रात्रंदिवस नदी पात्रातुन बेसुमार...

अभिमानास्पद : छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील १७ व्या शतकातील तीन लघुचित्रे प्रकाशात

पुणे :परदेशातील संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन तीन चित्रांचा शोध लागला आहे. जर्मनी, फ्रान्स आणि...

संचालक राहणार नसतील तर माझाही राजीनामा तयार – माजी मंत्री मधुकरराव पिचड; अगस्तीच्या संचालकांनी दिले चेअरमन मधुकरराव पिचडांकडे राजीनामे

अकोले (प्रतिनिधी)संचालकच राहणार नसतील तर माझाही राजीनामा तयार असल्याचे सांगून विरोधकांना आता उसउत्पादक आणि सभासदच जाब विचारतील...

यंदाही वारीचा मान लालपरीलाच ; आषाढी एकादशीसाठी पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम

आषाढीला पालख्या बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पायी वारीला मंजुरी...