रायझोस्पियरवर काम करणे आवश्यक : बोराळे ; विजया अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोथ एनहान्सर नवीन उत्पादन बाजारात

संगमनेर (प्रतिनिधी)
दिनांक 9 जुलै रोजी विजया अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या वतीने उत्पादित करण्यात आलेल्या ग्रोथ एनहान्सर हे नवीन उत्पादन शेतकर्‍यांसाठी बाजारात आणण्यात आले. या उत्पादनाचा शुभारंभ नुकताच उपविभागीय कृषी अधिकारी श्री. बोराळे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. बोराळे यांनी रायझोस्पियरवर काम झाले पाहिजे, तसेच शाश्‍वत शेतीसाठी रायझोस्पियर किती महत्त्वाचा आहे आणि आणि तो वाचवण्यासाठी ग्रीकॉस म्हणून आपली काय भूमिका आहे यावर सविस्तर मत मांडले. विजय अ‍ॅग्रोच्या जैविक व सेंद्रिय औषधांचा वापर वाढवून शेत जमिनीमध्ये कमीत कमी रासायनिक औषधांचा वापर करून शेती करण्याच्या संकल्पनेला त्यांनी दुजोरा दिला व प्रशंसा केली. वाढत्या खतांच्या किमती व दिलेल्या खतांचा योग्य पद्धतीने पुरवठा करण्यासाठी ग्रोथ एनहान्सर हा एक सशक्त पर्याय आहे. असे मत संगमनेर मार्केट कमिटीचे संचालक विवेक कासार यांनी मांडले.


सद्गुरुनी सुरू केलेल्या माती वाचवा या संकल्पनेला धरुनच विजया अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज एक तपासून काम करत आहे. म्हणूनच विजया अ‍ॅग्रोने आज शेतकर्‍यांच्या सेवेसाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मातीचे पूजन करून ग्रोथ एनहान्सर कीट शेतकर्‍यांच्या सेवेसाठी मार्केटमध्ये उपलब्ध केली आहे. या किटच्या वापरातून शेतकर्‍यांच्या खर्चामध्ये नक्कीच बचत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल अशी ग्वाही देखील विजया अ‍ॅग्रोचे संचालक विवेक रोहोकले व सविता मॅडम यांनी दिली. यावेळी सर्व कंपनी प्रतिनिधी व इतर प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख