Tuesday, January 18, 2022

वाढत्या निर्बंधांची लॉकडाऊनकडे वाटचाल ; रोजगाराचा प्रश्‍न पुन्हा होणार गंभीर ? नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज

संगमनेर (प्रतिनिधी)
दोन वर्षांपूर्वी अचानक आलेल्या कोरोनामुळे व त्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे जीवन विस्थापीत झाले. कामगार, छोटे उद्योजक, व्यापारी, कलाक ार, मजूर तसेच हातावर पोट असणार्‍या गोरगरीब नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या कोरोनामुळे व लॉकडाऊनमुळे अजूनही काहीजण सावरलेले नसतानाच पुन्हा तीसर्‍या लाटेचे संकट ओढावले आहे. शासनाने ही लाट रोखण्यासाठी पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहे. या निर्बंधामुळे कोरोनाला अटकाव बसला नाही तर पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे असे संकेत मिळत आहेत. दुसर्‍या लॉकडाऊनच्या संकटामुळे पुन्हा एकदा अनेकांची रोजी-रोटी संकटात सापडली आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे स्पष्ट संकेत सध्याच्या आकडेवारीवरुन दिसत आहेत. देशातील अनेक महाराष्ट्रासह अनेक राज्यात जमावबंदी, संचारबंदी यासह अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. धार्मिक सोहळे, लग्न, मयत, राजकीय कार्यक्रम यावरही निर्बंध वाढविले आहे. आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊन त्याचे रुपांतर ला ॅकडाऊनमध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान धार्मिक सोहळे, लग्न, राजकीय कार्यक्रम, सण-उत्सव यातून सर्वाधिक रोजगार हा मजूर व कामगारांना मिळत असतो. अनेक दिवस हा रोजगार बंद होता किंवा थंडावला होता.

आत्ता कुठे हा रोजगार सुरु झाला असतानाच पुन्हा त्यावर निर्बंधाची कुर्‍हाड कोसळली आहे. सलग दोन वर्ष जत्रा-यात्रा बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारे छोटे व्यापारी, तमाशा कलावंत, खेळणीवाले, रहाट पाळण्यावाले यांच्यासह अनेकांची रोजीरोटी बंद झाली होती. यावर्षी या जत्रा जोरात होणार असे वाटत असतांनाच व जत्रेत तमाशाचा फड पुन्हा रंगू लागलेला असतानाच कोरोनाच्या नावाखाली शासनाने पुन्हा एकदा सर्व जत्रांवर बंदी लादली आहे. यात्रेसाठी व संपूर्ण सीझन जोरदार करण्यासाठी घराबाहेर पडलेले तमाशा कलावंत पुन्हा आता घरी परतू लागले आहेत. अशीच अवस्था अनेक कामगार व श्रमीक वर्गाची आहे. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरातून लॉकडाऊनच्या भितीने पुन्ह एकदा कामगार घरी परतू लागले आहेत.

बांधकाम क्षेत्रावर सर्वाधीक मजूर वर्ग काम करत आहे. यातील बहूतांश मजूर हे परप्रांतीय आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने येेथील कामगार वर्ग घरच्यांच्या काळजीपोटी घरी परततांना दिसत आहे. एकूणच वाढते निर्बंध लॉकडाऊनकडे ढकलत असल्याचे दिसत असल्रूाने पुन्हा एकदा गोरगरीबांच्या जीवनात अंधार येण्याचे संकेत मिळत आहेत. सरकारकडून पाच किलो धान्य मिळत असल्याचा दावा केला जात असला तरी त्यावर कुणाचेही पोट चालू शकत नाही. कोरोनाचे निर्बंध लावा परंतू पुन्हा लॉकडाऊन नको असा सुर सर्व क्षेत्रातून उमटत आहे. सरकारनेही लॉकडाऊनऐवजी जनतेचे प्रबोधन करुन लसीकरण पुर्ण करुन दिलासा द्यावा अन्यथा यावेळी कोरोनाच्या मृत्यूऐवजी उपासमारीचे मृत्यू वाढण्याची शक्यता आहे.

  • कोरोनाची तीसरी लाट रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. लसीकरण वाढविले आहेत. बुस्टर डोस आज पासून सुरु केला आहे. असे असताना अनेक नागरकांनी लसीचा पहिला डोस घेतला नाही, मास्क वापरत नाहीत, नियम पाळत नाहीत अशा बेजबाबदार नागरिकांमुळे लॉकडाऊनचे संकेत गडद होण्याचे शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःसाठी व देशासाठी लसीकरण करावे व निर्बंधाचे पालन करावे.

जिल्ह्यातील कोरोनावाढ चिंताजनक!
दहा दिवसात एक हजार नवे रुग्ण

कोरोनाची तीसरी लाट अहमदनगर जिल्ह्यात प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर 2021 मध्ये जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर घसरली होती. मात्र नव्या वर्षात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने मागील दहा दिवसांत तब्बल एक हजाराच्या पुढे नवे रुग्ण आढळून आले आहे.
1 जानेवारी ते 4 जानेवारी पर्यंत रुग्णसंख्या मर्यादेत होती मात्र 5 जानेवारी (115), 6 जानेवारी (156), 7 जानेवारी (170), 8 जानेवारी (225), 9 जानेवारी (225) अशा प्रचंड चढत्या दराने रुग्णवाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter