Tuesday, January 18, 2022

२०२२ गाजवणार मराठी चित्रपट; येताय एकसे बढकर एक मराठी चित्रपट

येत्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये अनेक मराठी चित्रपटांची घोषणा झाली असून नव्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्गज दिग्दर्शक, कलाकार मनोरंजांची मेजवानी प्रेक्षकांना देणार आहे. चला तर बघूया एक झलक कोणते मराठी चित्रपट २०२२ गाजवायला येणार आहे.

Pawankhind

पावनखिंडीचा रणसंग्राम घडून ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ३१ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती.

De Dhakka 2

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय
घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय
‘दे धक्का २’ हा चित्रपट १ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘दे धक्का’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. ‘दे धक्का ‘ चित्रपटातील सर्व कलाकार ‘दे धक्का २’ मध्येही दिसून येणार आहेत. यावेळी कथा लंडनमध्ये घडताना दिसून येणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटासाठी फारच उत्सुक झाले आहेत. दे धक्कामध्ये सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांच्या मुख्य भूमिका होत्या.दे धक्का २ हा चित्रपट १ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर द्वयीकडे आहे. ‘दे धक्का २’मध्ये काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Zombivali

‘झोंबिवली’ या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हॉरर-कॉमेडी ‘झोबिंवली’ हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेले झोंबी आणि त्याविषयीची कथा याची उत्सुकता देखील वाढली आहे. झोंबिवली या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा झोम्बी या कल्पनेवर आधारित आहे.आत्तापर्यंत गेम्समध्ये, हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलेले झोम्बीज मराठी चित्रपटातही पाहायला मिळणार आहेत. रोमँटिक, जॉली भूमिका केलेले मराठी चेहरे हॉरर भूमिकेत दिसणार आहेत. या पूर्वी हा चित्रपट ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ved

महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून जिनिलिया देशमुखला ओळखले जाते. तब्बल १० वर्षांनी जिनिलिया पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. जिनिलिया पुन्हा पदार्पण करत असलेल्या मराठी चित्रपटाचे नाव ‘वेड’ असे आहे. १२ ऑगस्ट २०२२ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
20 वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी सज्ज झाला आहे. रितेश ‘वेड’ नावाच्या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. 20 वर्ष अभिनय कारकिर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
रितेश देशमुखने ट्विट करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. रितेशने सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,”20 वर्ष कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर आता मी पहिल्यांदाच कॅमेऱ्यामागे उभं राहण्याची मोठी झेप घेतली आहे. माझा पहिला मराठी सिनेमा दिग्दर्शित करत असताना मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवे आहेत. माझ्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा, वेड सिनेमाचा भाग व्हा.”

Chatrpati Tararani

महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणींवर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट २०२२ च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे असून राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटातून छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे. हा चित्रपट मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रित होणारा असून हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
छत्रपती महाराणी ताराबाई भोसले… मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री होत्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच याव्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा या चित्रपटात मांडण्यात येणार आहे.

Lagnkallol

मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘लग्नकल्लोळ’ हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्न म्हणजे देवाने घातलेलं सुंदर कोडं आहे. दिसायला कितीही सोपं असलं तरी प्रत्यक्षात मात्र जेवढं सोडवायला जाऊ तेवढं ते गुंतत जातो. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक या अनुभवातून जातात. याच संकल्पनेवर आधारित ‘लग्नकल्लोळ’ हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात  भारत गणेशपुरे,प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर,सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमखे आणि डॉ. आशिष गोखले  हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter