बांधकाम क्षेत्र निगडित कामगारांचा शनिवारी संगमनेरात महाआक्रोश मोर्चा

महाआक्रोश मोर्चा

यशोधन कार्यालय पासून निघणार असून प्रांत कार्यालयावर धडकणार  

संगमनेर (प्रतिनिधी )

गौण खनिज बाबत शासनाने केलेल्या जाचक नियमांमुळे व कडक निर्बंधांमुळे यावर अवलंबून असलेले पुरवठादार, मजूर, कामगार यांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत असून या सर्वांचा प्रचंड महाक्रोश मोर्चा शनिवार दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता यशोधन कार्यालय पासून निघणार असून प्रांत कार्यालयावर धडकणार  आहे.बांधकाम क्षेत्र हे पायाभूत विकासाचे क्षेत्र आहे. मात्र याबाबत  नगर जिल्ह्यात आणि विशेषता संगमनेर तालुक्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे  बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेले कामगार ,मजूर, पुरवठादार यांची उपासमार होत आहे .

तसेच बांधकाम साहित्याची झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे अभियंते, बांधकाम ठेकेदार, काम करण्यास कुठल्याच दृष्टीने परवडत नसल्याने त्याचा परिणाम प्रत्यक्ष जेसीबी मशीन मालक, डंपर ,ट्रिपल ,ट्रॅक्टर मालक व त्यांच्यावर अवलंबून असले खोदकाम मजूर यांचे काम उपलब्ध होत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

 महाराष्ट्रातील छोट्या शहरांपैकी संगमनेर तालुक्याची वाढ झपाट्याने होत आहे .परंतु शहराच्या वाढीत महत्त्वाचा वाटा असलेले बांधकाम क्षेत्र मोडकळीस आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. अशाच प्रकारचे जाचक शासन निर्णय व बांधकाम क्षेत्रास पूरक परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत लाखो मजुरांची हाल होत राहणार असेच चित्र सध्या निर्माण झाली आहे .यामुळे शासनाने या सर्व निर्णयांचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा व हजारो संसार उध्वस्त होण्यापासून वाचवावे .याकरता या विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 यामध्ये बांधकाम क्षेत्रातील अभियंते, शेतकरी, बांधकाम ठेकेदार, सेंट्रींग ठेकेदार, फरशी कामगार ,ठेकेदार ,खोदकाम, रंगकाम ,इलेक्ट्रिक ,प्लंबिंग सुतार,  अकुशल कामगार व या विविध व्यवसायावर उपजीविका असणारे सर्व मजूर मोठ्या संख्येने  बि-हाड मोर्चात सहभागी होणार आहे.तरी या विराट महाअक्रोश मोर्चा सर्व मजूर कामगार यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख