Saturday, July 10, 2021

जाणून घेऊया इतिहास : 12 जून संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलचा स्थापनादिन

संगमनेरात त्या दिवशी मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. एका छोट्या दवाखान्याच्या जागी तत्कालीन शासनाच्या निर्णयानुसार कॉटेज हॉस्पिटलची सुरवात झाली होती. डॉ. बी. एल. काटे हे पहिले मेडिकल ऑफिसर होते. सोबतीला आणखी एक स्त्री डॉक्टर, दोन नर्सेस, कंपाऊंडर, दोन स्त्री व दोन पुरुष कर्मचारी, एक सफाई कामगार आणि एक स्वयंपाकी असा स्टाफ नेमण्यात आला…
तो दिवस होता 12 जून 1943.

1873 च्या सुमारास संगमनेर तसे छोटे खेडेच. त्यावर्षी नगरपालिकेने पहिला दवाखाना सुरू केला. सध्याच्या कोर्टाजवळ हा दवाखाना होता. डॉ. कृष्णराव जानू हे 1873 मध्ये रुजू झालेले पाहिले मेडिकल ऑफिसर. 1881 साली म्हाळुंगी नदीच्या बाजूच्या गढीवरील डी. एड. कॉलेजच्या प्रशस्त जागी हा दवाखाना हलवला गेला. आज जी बी. एड. कॉलेजची इमारत उभी आहे ही नगरपालिकेच्या दवाखान्याची इमारत आहे. या ठिकाणी स्त्री व पुरुषांसाठी दोन स्वतंत्र वार्ड होते. 1886 मधील एक आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार त्यावर्षी 15 हजार 210 लोकांनी या दवाखान्यात उपचार घेतले. 1887 साली पालिकेने या दवाखान्यासाठी 15 रुपयांचे एक मोठे घड्याळ घेतले. या घड्याळाचे त्याकाळी लोकांना मोठे अप्रूप वाटायचे. याकाळात गरीब रुग्णांना मोफत भोजन पुरवले जायचे.
पुढची जवळपास पन्नास वर्षे याच ठिकाणी दवाखाना होता. संपूर्ण तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातील लोक उपचारासाठी संगमनेरला यायचे. 1937 -38 साली दवाखान्याच्या विस्ताराची गरज निर्माण झाली. सध्याच्या नगरपालिकेच्या आवारात मॅटर्निटी विभागाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागी रुक्मिणीबाई शिवलाल लाहोटी यांनी दिलेल्या 3 हजार रुपयांच्या देणगीतून संगमनेरमधील पाहिला मॅटर्निटी वॉर्ड बांधला. राधाबाई परशराम कर्वे यांच्या साडेतीन हजार रुपयांच्या देणगीतून दवाखान्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले. या दोन्ही इमारती आजही बघायला मिळतात.


1943 मध्ये इंग्रज सरकारने तालुक्यांच्या गावी कॉटेज हॉस्पिटल उभारण्याची योजना आखली. तत्कालीन मुंबई इलाख्यात एकूण पाच गावे निवडण्यात आली. या पाच गावात संगमनेरचा समावेश होता. संगमनेरला दवाखान्याच्या नव्या इमारतीचे काम सुरू झाले होतेच. 21 एप्रिल 1943 रोजी शासकीय ठराव क्र. 4661/36 नुसार या दवाखान्याला कॉटेज हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आला आणि प्रत्यक्षात 12 जून 1943 ला नवा स्टाफ दाखल झाला.
1951 मध्ये ऑपरेशन थिएटर, 1953 पासून पोस्ट मार्टेमरूम, 1954 पासून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रूम उभारण्यात आली.
1956 च्या पुरानंतर गावातील काही व्यक्तींनी गरीब रुग्णांना औषध खरेदी करण्यासाठी मदत म्हणून ‘ पूअर फंड ‘ सुरू केला. पालिकेनेही आपल्या एकूण उत्पन्नाच्या 12 टक्के रक्कम दवाखान्याची खर्च करायला सुरुवात केली. 1959 मध्ये हॉस्पिटल फंड म्हणून निधी जमा करायला सुरुवात केली. गावातील नाट्यप्रेमी मंडळींनी अभिनव नाट्य संस्थेच्या माध्यमातून नाटके सादर करून कॉटेज हॉस्पिटलसाठी निधी जमा केला. याचबरोबर पालिका कर्मचारी, तिरुपती क्लब व गावातील दानशूर लोकांनी गरीब रुग्णांसाठी वर्गणी जमा करून निधी उभारला.

21 वे शतक सुरू झाले, खासगी वैद्यकिय व्यावसायिकांची संख्या वाढली. कधीकाळी उपचार घेताना गरीब श्रीमंत असा भेद नव्हता, आज तीस पस्तीस पेक्षा अधिक वय असलेल्या बहुसंख्य संगमनेरकरांचा जन्म कॉटेज हॉस्पिटलमध्येच झाला आहे… 1897, 1906, 1913, 1919, 1934, 1948, 1949 मध्ये आलेली कॉलऱ्याची साथ, 1899,1906, 1945 ते 1948, 1949 या वर्षी आलेल्या प्लेगच्या आणि इतर अनेक आजारांच्या साथी, मागील वर्षी आलेली कोरोनाची आपत्ती, इतर छोटे मोठे आजार, अपघात यातून असंख्य संगमनेरकरांना या हॉस्पिटलने जीवनदान दिले आहे. संगमनेरकर नागरिकांच्या मागणीनुसार हे हॉस्पिटल पुन्हा एकदा जोमाने कार्यरत व्हावे ही अपेक्षा.
कॉटेज हॉस्पिटलला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.

डॉ. संतोष खेडलेकर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

नामदार थोरात यांच्या उपस्थितीत गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान

संगमनेर (प्रतिनिधी) सन 2019- 20 या गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान रविवार दिनांक 11 जुलै 2021...

शहिद जवान गोकुळ कचरे यांच्या परिवारास ५१ हजार १५१ रुपयांची मदत; सैनिक कल्याण समितीची बैठक उत्साहात – विविध ठराव मंजूर

संगमनेर (प्रतिनिधी)सैनिक कल्याण समिती संगमनेर (महाराष्ट्र राज्य) समितीची मासिक मीटिंग रविवार दिनांक 4 जुलै रोजी समितीच्या कार्यालयात...

…माझ्यासाठी तो कॅच ऑफ द इयर : सचिन तेंडुलकर ; हरलीन देओलचा सुपरकॅच व्हायरल, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक...

सावधान : जिल्ह्यात कोरोना वाढतोय; संगमनेरातही रूग्णसंख्येत वाढ – 60 रूग्णांची भर

संगमनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही दिवसांपासून किंचित वाढ होणार्‍या कोरोनामध्ये आज मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज...

रविवारी 500 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण- सौ. दुर्गाताई तांबे

संगमनेर (प्रतिनिधी)कोरोना पार्श्‍वभूमीवर संगमनेर शहरातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना संगमनेर नगर परिषदेच्या वतीने रविवारी दिनांक 11 जुलै 2021...