Tuesday, January 18, 2022

संगमनेर बसस्थानकातून पोलीस बंदोबस्तात लालपरी रवाना

State Transport Started From Sangamner Bus Stand

संगमनेर (प्रतिनिधी)
तब्बल दोन महिन्यांपासून एस. टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे लालपरी बसस्थानकातच उभी होती. शासन व कर्मचार्‍यांमध्ये अनेक बैठका झाल्या, प्रकरण न्यायालयात गेले मात्र तरीही आजपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. काही कर्मचार्‍यांनी या संपातून माघार घेतली मात्र इतर कर्मचारी त्यांना काम करु देत नसल्याने एस. टी. बस बसस्थानकातून हलू शकल्या नाहीत. मात्र शासनाने काम करणार्‍यांना सुरक्षा पुरवू असे आश्‍वासन दिले त्यानुसार आज शनिवारी तब्बल दोन महिन्यानंतर पोलीस बंदोबस्तात संगमनेर-नगर ही बस रवाना करण्यात आली.


एस. टी. महामंडळाचे विलिनिकरण करावे या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी कुठल्याही परिस्थीतीत संप मागे घ्यायचा नाही असा निर्धार केला आहे. शासनाने आत्तापर्यंतची सर्वात चांगली पगारवाढ दिल्यानंतरही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहे. या आंदोलनादरम्यान अनेक कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली. अनेकांचे अकस्मात निधन झाले. शासनाने अनेक कर्मचार्‍यांना निलंबीत केले, बडतर्फ केले. मात्र तरिही कामगार संपातून माघार घेण्यास तयार नाही. यादरम्यान एस. टी. महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. प्रवाशांनाही खाजगी वाहनांचा आसरा घ्यावा लागला मात्र त्यातून प्रवाशांची मोठी लूट झाली. या सर्व घडामोडीनंतर शासनाने काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी पोलीस संरक्षण पुरविण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे काही आगारांमध्ये कर्मचारी कामावर परतले. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून संप व प्रवाशांअभावी संगमनेर बसस्थानक ओस पडले होते.


मात्र आज काही कर्मचारी कामावर परतले त्यामुळे शहर पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली संगमनेर ते अहमदनगर या बसला पोलीस संरक्षण देत प्रवाशांसह रवाना करण्यात आली. अखेर संगमनेर बसस्थानकातून पहिली बस रवाना झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter