Saturday, July 10, 2021

तालुक्यात अवैध वाळू उपसा थांबेना; निसर्गप्रेमींनी नदी पात्रात झोपून प्रशासनाला केले जागे

संगमनेर (संजय आहिरे)
अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणि कारवाई करणार्‍या महसूल खात्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्याच संगमनेर तालुक्यात अवैध वाळू तस्करीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेकदा तक्रारी करूनही पोलीस व महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वृक्ष परिवार, निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवरा नदीपात्रात झोपून आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनानंतरही प्रशासन जागे झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरीकांनी दिला.

illegal-sand-extraction in Sangamner; Video By Mr. Rajedra Sutar

संगमनेर जवळच्या खांडगाव येथेही मंगळवारी वाळूच्या अवैध तस्करी विरोधात संतप्त नागरिकांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. तेथेही अवैध वाळू उपसा सुरू आहे. रात्रंदिवस वाळू उपसा आणि वाहतूक होत असल्याने ग्रामस्थांना रात्रीची झोपही अशक्य झाली होती, त्यामुळे शेतकरी व नागरीकांनी आंदोलन छेडत महसूल प्रशासनाला जाब विचारला त्यामुळे अधिकार्‍यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले.

दरम्यान संगमनेरजवळ प्रवरा नदीपात्रातील गंगाईमाई घाट परिसरात बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रातील पुरातन घाट, मंदिरे यांनाही धोका निर्माण झाला आहे. नदी पात्रात मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहे. या खड्यांनी अनेकांचे बळी घेतले आहे. या वाळू उपशामुळे नदी पात्रातील विहरी व पाईप लाईन उघड्या पडल्या आहेत. नदी काठच्या विहीरींचे पाणीही आटले व दुषीत झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ येथील वाळू उपसा बंद करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, प्रशासन लक्ष देत नसल्याने वाळू तस्कर मुजोर झाले आहे. वाळू वाहतूक करणारे वाहने रात्रंदिवस शहर व उपनगरात धावत असतात. विना नंबरची ही वाहने गल्ली बोळातून वेगात धावत असतात. या वाहनांमुळे नागरीकांजी जीव नेहमी टांगणीला लागलेला असतो. अनेक अपघातांना ही वाहने कारणीभूत ठरत असताना पोलीस व महसूल प्रशासन मात्र मूग गिळून शांत बसलेले दिसते. त्यामुळे या मुजोर झालेल्या वाळू तस्कांना कुणाचा आशीर्वाद आहे? असा प्रश्‍न सर्व सामान्य नागरीकांना पडला आहे.

महसूल मंत्र्यांचा हा तालुका असल्याने तेथे अशा प्रकारांची गौणखनिजाची लूट सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वेळा या वाळू तस्करीची पुराव्यासह तक्रार करूनही प्रशासन आणि पोलिस कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिक करत आहे. अनेकदा पोलिसांनी पकडलेली वाहने कारवाईविना सोडून दिल्याचा अनुभवही नागरिक घेत आहे. तर काही वाळू चोर बनावट पावत्या, बनावट कागदपत्रे दाखवून सुटका करून घेतात. वाळू उपशासाठी अनेक मध्यस्थ, दलाल तयार झाले असून त्यांचे प्रशासनाशी कसे लागेबांधे आहेत, यासंबंधीच्या ऑडिओ क्लीपही व्हायरल झालेल्या आहेत. एका बाजूला तालुक्यात कोरोेनाने उच्छाद मांडलेला असतानाही दुसरीकडे तालुक्यातील मुळा, प्रवरा, म्हाळूंगी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याचे दिसते. आता करोना नियंत्रणात आल्यानंतर वाळू उपसा पुन्हा वेगाने सुरू झाला आहे. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर वाळू उपसा करता येत नाही. त्यामुळे पाणी येण्यापूर्वीच नदी पात्रातील वाळू बाहेर काढून ती साठवून ठेवण्यासाठी संबंधितांची धावपळ सुरू आहे.

अनेक ठिकाणी लिलाव झालेले नाहीत, तर कोठे लिलावात ठरल्यापेक्षा जास्त प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. कोरोनाच्या उपाययोजनांत प्रशासन अकडल्याचाही वाळू चोरांनी गैरफायदा घेतल्याचे दिसून येते. कडक कारवाई होत नाही, चोरांना पाठिशी घालण्याचे प्रकार होतात, त्यामुळे त्यांचे धाडस वाढत असल्याचा आरोप वृक्ष परिवार, पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी केला आहे. आमच्या गावातील वाळू उपसा थांबवा अशी हात जोडून विनंती खांडगाव येथील ग्रामस्थ करीत होते. तर संगमनेरमधील घाटावर निसर्गप्रेमींनी नदीपात्रात ठिय्या दिला आणि नंतर तेथेच झोपून आपल्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. अवैध वाळू उपशाविरूदध वेळोवेळी कारवाई सुरूच असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र त्यात कारवाई पेक्षा स्व: हीत जास्त साधण्याचे प्रकार होतांना दिसतात.

आज प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केवळ नदीपात्रात झोपून आंदोलन केले, त्यातून प्रशासनाला जाग न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संगमनेर येथील वृक्ष परिवाराच्यावतीने डॉ. राजेंद्र मालपाणी, कुलदीप ठाकूर, निलेश जाजू, ओंकार भंडारी, शिरीषमुळे अमोल खताळ, राजेंद्र चांडक, मुकूंद गरूडकर, संतोष पवार, कैलास बोरकर, पुनम कासार, सुरज गुप्ता, धीरज शिंदे, समीर ओहरा, वैभव पाटसकर, विशाल बद्दर, विशाल भिंगरे, मदन पारग, संजय राहाणे, राजाभाऊ भंडारी, जगदीश इंदानी, सुरेश बिहाणी आदिंसह अनेक समाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन या वाळू तस्करांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवदेन प्रशासनाला दिले. प्रशासनाने याची गंभीरपणे दखल न घेतल्यास वृक्ष परिवर व निसर्गप्रेमींच्या वतीने तीव्र आंदोल करण्याचा इशारा नागरीकांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

नामदार थोरात यांच्या उपस्थितीत गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान

संगमनेर (प्रतिनिधी) सन 2019- 20 या गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान रविवार दिनांक 11 जुलै 2021...

शहिद जवान गोकुळ कचरे यांच्या परिवारास ५१ हजार १५१ रुपयांची मदत; सैनिक कल्याण समितीची बैठक उत्साहात – विविध ठराव मंजूर

संगमनेर (प्रतिनिधी)सैनिक कल्याण समिती संगमनेर (महाराष्ट्र राज्य) समितीची मासिक मीटिंग रविवार दिनांक 4 जुलै रोजी समितीच्या कार्यालयात...

…माझ्यासाठी तो कॅच ऑफ द इयर : सचिन तेंडुलकर ; हरलीन देओलचा सुपरकॅच व्हायरल, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक...

सावधान : जिल्ह्यात कोरोना वाढतोय; संगमनेरातही रूग्णसंख्येत वाढ – 60 रूग्णांची भर

संगमनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही दिवसांपासून किंचित वाढ होणार्‍या कोरोनामध्ये आज मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज...

रविवारी 500 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण- सौ. दुर्गाताई तांबे

संगमनेर (प्रतिनिधी)कोरोना पार्श्‍वभूमीवर संगमनेर शहरातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना संगमनेर नगर परिषदेच्या वतीने रविवारी दिनांक 11 जुलै 2021...