Monday, July 19, 2021

नानासाहेब वर्पे उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित ; उद्योग व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या विविध मान्यवरांचा गौरव

संगमनेर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने यशस्वी उद्योजकांना दरवर्षी भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार सोहळा येथील मालपाणी लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सुप्रभा पॉलिमरचे संचालक नानासाहेब हरीभाऊ वर्पे यांना उद्योग भूषण पुरस्काराने महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्नामनित करण्यात आले. यावेळी आ.डॉ. सुधीर तांबे, उद्योजक गिरीष मालपाणी, टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापक सुशीलकुमार राणे, संस्थेचे कार्याध्यक्ष पुरोषत्तम सदाफुले, रंगनाथ गोडगे, मुरलीधर साठे, सुदाम मोरे उपस्थित होते.

उद्योग व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या विविध मान्यवरांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उद्योजकांना प्रेरणा व स्मृती मिळावी, औद्योगिक क्षेत्रात प्रगती व्हावी या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे या संस्थेच्या पुढाकारातून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. या सोहळ्यात अंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन इटकर यांना उद्योग मित्र, नांदेडचे मारोतराव कवळे यांना उद्योगरत्न, देवळाली प्रवराचे गणेश भांड यांना उद्योग विभूषण तर नानासाहेब वर्पे यांना उद्योग भूषण पुरस्काराने गोरविण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

खांडगांव ते पेमगिरी रस्त्याची दुरावस्था, प्रशासनही निद्रिस्त? ; लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा खड्डयामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून प्रवाश्यांना त्याचा फटका बसत आहे....

राजूर पोलीसांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान; गुन्ह्याचा जलद गतीने तपास केल्याने कौतुक

राजूर (विलास तुपे )राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,...

नानासाहेब वर्पे उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित ; उद्योग व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या विविध मान्यवरांचा गौरव

संगमनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने यशस्वी उद्योजकांना दरवर्षी भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात; पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच...

दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढीस – महसूल मंत्री नामदार थोरात ; अमृतवाहिनी बँकेच्या वतीने क-हे घाटात वृक्षारोपण

संगमनेर (प्रतिनिधी)ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव उपाय आहे. मागील दोन वर्षापासून आलेल्या कोरोना संकटात प्राणवायूचे...