Wednesday, October 20, 2021

अखेर सुवर्णपदक मिळालंच !! ; नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर कोरलं नाव

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरला आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८७.०३, दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८, तिसऱ्या प्रयत्नात ७६.९७ मिटर लांब भाला फेकला. नीरजचा चौथा आणि पाचवा प्रयत्न फाऊल झाला.


ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.

नीरज चोप्रा हा भारताचा भालाफेक क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे. तो आज पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. २३ वर्षीय नीरज चोप्राने पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भाला फेकला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...