Tuesday, January 18, 2022

संगमनेरचे वैभव : वंचितांचे ‘आधार फौंडेशन’

प्रेमाचा शब्द, स्नेहाचा स्पर्श
आपुलकीची नजर,कौतुकाची थाप, खळखळून हास्य
आणि मदतीचा हात…या छोट्याशा गोष्टी… पण आपल्या बरोबर इतरांचे
आयुष्य बदलून टाकतात..एका छोट्याशा आधारानं…

देणार्‍याने देत जावे,
घेणार्‍याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस,
देणार्‍याचे हात घ्यावे…

समाजाची उतराई व्हावं या प्रामाणिक उद्देशानं तळेगांव दिघे मधील बाळासाहेब पिंगळे, विलास दिघे, डॉ सोमनाथ जोंधळे, पि.डी. सोनवणे, मी स्वतः सुखदेव इल्हे सारखी काही माणसं 1998 साली एकत्र येत आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, वाचन चळवळ, रक्तदान यासारख्या समाजहिताचे उपक्रम सुरू झाले. डॉ. कल्याण गंगवाल यांना बोलावत व्यसनमुक्ती चळवळ हाती घेतली. तळेगावला गुटखाबंदीचे उपक्रम घेतले. व्यसन मुक्ती प्रदर्शनातून तालुकाभर जागृती होऊ लागली.व्याख्यानं होऊ लागली.


विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची आवड लागावी, स्पर्धा परीक्षेचे बाळकडू मिळावे. आणि अवांतर वाचनाची विद्यार्थ्यांना गोडी लागावी या हेतूने सलग चार वर्षे ज्ञानसंपदा स्पर्धा परीक्षा राज्यस्तरावर आयोजित केल्या गेल्या. यातून अनेक विद्यार्थी चमकले आणि स्पर्धा परीक्षेची एक चळवळ उभी राहिली.
पुढे संगमनेरमध्ये, 2007 साली अनिल कडलग,ड ॉ. महादेव अरगडे, सोमनाथ मदने, विठ्ठल कडुसकर, तानाजी आंधळे, ललिता दिघे, लक्ष्मण कोते, डॉ, सुधाकर पेटकर यासारखी समविचारी माणसं एकत्र आली. कार्यकर्त्यांचे सूर जुळले आणि योगदान संस्थेचे रुपांतर आधार ग्रूपमध्ये झाले. पी डी सोनवणे सर यांचे घरी झालेल्या मिटींगमध्ये आधार संस्थेचे बीज रोवले गेले.


नंतर आधार समन्वयक डॉ. महादेव अरगडे या समाजसेवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली साई समर्थ हॉस्पिटलमध्ये आधार कार्यालय सुरु झाले. गरजू निराधार मुलांसाठी वह्या, पुस्तके वाटप सुरू झाले. रक्तदान शिबीरं, आधारची एक करंजी एक लाडू हा सामाजिक दिवाळीचा उपक्रम सुरु झाला.बघता बघता संस्था चांगले बाळसं धरू लागली. गरजू मुलांना मदत करताना वह्या- पुस्तके यांच्या सोबत मुलांना इतर गरजा आहेत, त्यांना दप्तर, शूज,परीक्षा फी,प्रवेश फी अशा अनेक अडचणी असतात. मग आधार शैक्षणिक दत्तक पालक योजना सुरु झाली. अन् ख-या अर्थाने निराधार मुलांसाठी मोठं काम उभं राहू लागलं.


2013 साली संगमनेर मधील अनेक मित्रांसोबत आधार ग्रूपचे कामकाज वेगाने वाढू लागले. अच्छे मार्गदर्शक,दैनिक युवावार्ताचे संपादक किसनभाऊ हासे यांनी संकल्पना मांडली आणि आधार ग्रुपचे नाव आधार फाऊंडेशन असे झाले. पुन्हा नव्यानं संस्थेचे रजिस्ट्रेशन झाले. आधार संस्थेचे संचालकांनी समन्वयक म्हणून काम सुरु केले.
महिन्याला केवळ दहा रूपये जमा करत सुरू झालेली ही छोटी चळवळ…. आधारवड होऊ पाहत आहे.

राजेंद्र फरगडे,आर वाय कमलाकर, किसनभाऊ हासे, मृणाल पवार,प्राचार्य मुकूंद डांगे,प्राचार्य पी आर शिंदे,व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर,निवृत्ती शिर्के, ,त्र्यंबक शिंदे,शाम वाडेकर,या सारखे सेवाभावी बिनीचे शिलेदार आधारला मिळाले.


आधार शैक्षणिक दत्तक पालक योजना आधारचा आत्मा आहे. ज्यांना आई-वडील नाही, किंवा एकच पालक आहेत अशी शेकडो मूलं शिक्षणापासून वंचित राहणार होती.ती प्रवाहात आली. आधारने त्यांच्या पाठीवर हात ठेवतं.. लढं म्हणत त्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या शैक्षणिक गरजांबरोबर, परीक्षा फी, सहल, संगणक शिक्षण, प्रवेश फी यासाठी आर्थिक मदत केली. पहिल्या पासूनच आधारचे सर्व व्यवहार पारदर्शी होऊ लागले.त्यामुळे लोकांना आधार बद्दल पुर्ण विश्‍वास मिळाला. आधारचा प्रत्येक शिलेदार ते अत्यंत प्रामाणिकपणे जपत आहे.

आधार शैक्षणिक दत्तक योजना..
इ.1ली ते 4 थी – 2000 रुपये
इ.5 वी ते 7 वी – 2500 रुपये
इ. 8 वी ते 10 वी – 3000 रुपये
इ.11-12वी – 3500 रुपये
उच्च शिक्षण – 6000 रुपये
व्यवसायिक शिक्षण – 10000 रुपये
(इंजि,मेडिकल,आयटीआय)

या योजनांना समाजातून खूप बळ मिळाले, कोणी एक मुलाला शैक्षणिक दत्तक घेत पुर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली. तर कुणी दोन-चार मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले. शिक्षणातील गुंतवणूक म्हणजे खूप मोठ़ योगदान.. राष्ट्र उभारणीचं छोट पाऊल. एखाद्या रस्त्यावरील कुटुंबातील एक मुलगा उभा राहणं म्हणजे एका कुटुंबाला आधार देण्यासारखे… एक कुटुंब भक्कम उभं राहण्यासारखे.


समाजसेवी,दातृत्ववान अनेक माणसं आधारसोबत भक्कम उभी राहिली. मेजर सुर्यकांत घेगडमल, रावसाहेब पावसे, भास्कर पाटील(नाशिक),विष्णू बडे,(शेवगाव) अनुपमा कामत(मुंबई) चारूचंद्र परांजपे (नाशिक)यांनी परिवारातील प्रत्येक सदस्याने एक गरजू मुलगा-मुलगी शैक्षणिक दत्तक घेतली. म्हणजे एका कुटुंबाने दोन-चार गरजू मुलांची शिक्षणाची जबाबदारी उचलली.


2014 मध्ये दैनिक लोकसत्ताने आधारचा आधारस्तंभ -सुखदेव इल्हे हा लेख राज्यभर प्रसिद्ध केला. यामुळे आधार राज्यात पोहचला.मुंबई, नाशिक,पुणे, अमरावती, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद या सारख्या ठिकाणावरुन अनेक शिलेदार जोडले गेले. आधारला सामाजिक कामासाठी लाखो रूपयांची मदत मिळाली. कामाला बळ मिळालं.
आधारची खूप मूलं आता उभी राहू लागली आहे.

अमितचे वडील अपंग तर आई शेळ्या वळायची. त्याला बीसीएला प्रवेशाची अडचण.आधारने दहा हजार देत अमितला प्रवेश मिळवून दिला. आज अमित वेबसाईट डिझाईनर आहे. त्याची स्वतःची कंपनी आहे. योगिता संगमनेर येथे बी.एच. एम.एस.करत होती. पुस्तके नव्हती. पण अशाही परिस्थितीत ती दुसर्‍या वर्षात प्रथम आली. तिला वडील नव्हते, तर आई एका वस्तीगृहात स्वयंपाक करायची. आधार शिलेदार डॉ. प्रसाद रसाळ यांच्या ते लक्षात आले. तिला आधारतर्फे शैक्षणिक दत्तक पालक योजनेत मोठी मदत झाली. आज तीचे येवला येथे क्लिनिक आहे.

शशिकलाला आई वडील नव्हते. तिला इंजिनिअरींगला आधारने मदत केली. ती आज चाकण,पुणे येथील चांगल्या कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत आहे. वडिलांचे छत्र नसलेला आधारचा प्रसाद देशमुख आज इंजिनिअर होऊन साडे पाच लाखाचे पॅकेज घेत आहे. आय टीआय झालेला नागेश कदारेला फिटर व्हायचे होते. पण त्याने सीएनसीचा कोर्स आधारच्या मदतीने पूर्ण केला.नोकरीही करतो.शिवाय महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमात तो महाराष्ट्र राज्यात तिसरा आला, पाच हजाराचे बक्षिस मिळविले. त्याची पुढील स्पर्धेसाठी देशपातळीवर निवड झाली आहे.

सुगावचा आदिवासी मुलगा उमेश कातोरे डोंगरावर झोपडीत राहायचा. अतिशय हुशार असलेला उमेश आधारचे डॉ. महादेव अरगडे यांचे मार्गदर्शन घेत जें जे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई मध्ये एम बी बी एस करतो आहे. त्याला मेसला पैसे नव्हते,तो पैशाअभावी एकच वेळ जेवण करायचा.आधार समुपदेशक डॉ. चित्रलेखा देशमुख यांनी त्याच्या सर्व मेसची जबाबदारी उचलली. तो आज तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातील सुवर्णा गोर्डे,इंजिनिअर होऊन आई- वडिलांचा आधार झाली आहे. अशी कितीतरी मूल आज आत्मविश्‍वासाने स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे.
आधार दत्तक पालक योजनेत यावर्षी 174 अशीच अत्यंत गरजू व निराधार मूलं शिक्षण घेत आहेत.

आधारची जळीत कुटुंबांना मदत
अचानक आग लागून एखादं घर जळून खाक होतं.कुटुंब रस्त्यावर येतं. त्यांना कपडे-लत्ते, भांडी,किराणा,धान्य,निवा-याची गरज असते.आजपर्यंत 100 पेक्षा जास्त कुटुंबांना संवेदन शीलता दाखवत आधारने तातडीने मदत केली आहे.


वाचन चळवळ
वाचन संस्कृतीच प्रेरणादायी काम या संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आले.
आधार व अक्षरभारती पुणे यांचे वतीनं संगमनेर तालुक्यातील 36
प्राथमिक, माध्यमिक विद्यालय यांना दर्जेदार पुस्तके असलेली मोफत वाचनालय देण्यात आली. लाखो रूपयांच्या या पुस्तकांसाठी अक्षरभारती पुणे येथील भानुदास आभाळे, संतोष शेळके यांचे बहुमोल योगदान लाभले.

महारक्तदान शिबीरं आयोजन
सेवाभावी डॉक्टर महादेव अरगडे यांच्या कै. धीरजची स्मृती जपत आधारने 13 वर्षांपासून 15 महा- रक्तदान शिबीरं आयोजित केली आहे. या शिबीरातून 2000 पेक्षा जास्त रक्तपिशव्या संकलन झाले आहे. याचा फायदा परिसरातील अनेक गरजूंना झाला आहे.


आधार दिवाळी

दर वर्षी समाजातील वंचितांसाठी आधारची सामाजिक दिवाळी साजरी होते. ज्यांना घरचं नाही, जे पालात राहत अत्यंत उपेक्षित जीवन जगतात. अशाच ऊसतोड कामगार, भटकंती करणारे लोक, अशा किमान 100 कुटुंबात आधार प्रत्येकी 1 किलो फराळ,एक नवी साडी त्या बहिणीला देतं.. दिवाळी साजरी करते.


पुढील संकल्प

संस्थेने नुकतीच संगमनेर परिसरात दोन गुंठे जागा घेतली आहे. या ठिकाणी आधार 100% निराधार, अपंग,मुलांसाठी, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्याचा मानस आहे. या मुलांना वाचनालय, मार्गदर्शन, निवासाची सोय आदी सुविधा निर्माण करणार आहे. काही गरजूंना व्यवसाय मार्गदर्शन केंद्रही सुरु करण्याचा माणस आहे.
पण यासाठी फार मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदानाची आवश्यकता आहे. समाजातील अनेक दानशूर बांधवाच्या मदतीने हे नक्कीच लवकर पूर्ण होईल.

आर्थिक मदतीसाठी
खात्याचे नाव : आधार फाऊंडेशन
बँकेचे नाव : इंडियन ओवरसीज बँक संगमनेर
खाते नंबर : 197001000006060
आय एफ सी- IOBA001970

मो . 99708666271, 9422332572

Email – [email protected]
Website : www.adharfoundation.in


कार्यालय – श्री साई समर्थ हॉस्पिटल, दुसरा मजला
रहाणे मळा, गुंजाळवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर

https://www.adharfoundation.in/

Sukhdev IIlhe sir

सुखदेव इल्हे, समन्वयक
आधार फाऊंडेशन, संगमनेर
9422332572

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter