Monday, May 3, 2021

दुधाला किमान पाच रुपये अनुदान द्या -सतिशराव कानवडे

संगमनेर:-कोरोना महामारीच्या संकटामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. टाळेबंधीच्या नावाखाली राज्य सरकारने दुधाचे भाव पाच रुपयांनी कमी केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी,महिला,युवक यांना तारनहार ठरणारा दुग्धव्यवसाय आहे पंरतु राज्य सरकार व सहकारी दुध संस्था, खाजगी दुध संस्था या दुध धंद्यातील मलई खान्याचे काम करतात आणि शेतकरी मात्र काबाडकष्ट कष्ट करुन कर्जबाजारी होत आहे,यातून सावरण्यासाठी महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात यावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चा उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष सतिशराव कानवडे यांनी मुख्यमंत्री, पशु व दुग्धविकास मंत्री यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की
आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूधाचे भाव पाच रुपयानी कमी करुन २२ते २५ रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा भागू शकत नाही.
सध्याच्या काळात पशुखाद्य सरकीपेंड चा भाव २०ते २१ रूपये होता तो आत ३०रुपये झाला आहे, मका १२ रु किलो होती ती आता १८ रुपये किलो झाली आहे,सोयाबीन४००० रुपये भाव होता तो आता ७०००रुपये झाला आहे, पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहे,दुभत्या जनावरांना ऐवढा मोठा खर्च होतो शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.सर्व खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हातात काहिच शिल्लक राहत नाही,दुध संस्था मात्र पँकिग दुधात भाव कमी करत नाही,पशुखाद्य चे भाव कमी होत नाही मग फक्त शेतकऱ्यांच्या दुधाचे मनमानी बाजारभाव दुध संस्था का करतात? महाराष्ट्र राज्यातुन दुग्ध व्यवसायाची मोठी ओळख निर्माण झाली आहे,राज्यासह शेजारील राज्याची दुधाची गरज महाराष्ट्रातील शेतकरी भागवत आहे, उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे, मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे मात्र शेतकरी नेहमीच या व्यावसायात आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशीच अवस्था राहिली तर ग्रामीण भागातील दुध व्यवसाय मोडकळीस निघालेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा म्हणुन राज्य सरकारने किमान पाच रुपये प्रती लिटर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे व शेतकरी राजाला या संकटातून सावरण्यासाठी सहकार्य करावे अन्यथा शेतकरी टाळेबंधीचे नियम मोडुन रस्त्यावर येईल,दुध संकलन केंद्रावरुन दुधाची वाहतूक ठप्प करु असा इशारा निवेदनाद्वारे सतिशराव कानवडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,909चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

भारतीय जनता पार्टी उत्तर अहमदनगर ओबीसी मोर्चा सरचिटणीस पदी भारत गवळी यांची निवड

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब गाङेकर यांनी संगमनेरात मागील अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे...

संगमनेर मधील प्राथमिक शिक्षकांनी उभारलेल्या ‘कोविड केअर’ सेंटर चे काम राज्यातील शिक्षकांसाठी दिशा दर्शक

संगमनेर (प्रतिनिधी) - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य...

अज्ञात इसमांकडुन बदाम वृक्षाची तोड; वृक्षप्रेमींमध्ये संताप

संगमनेर (प्रतिनिधी)स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर या अंतर्गत संगमनेर नगरपालिकेने पूणे नाशिक महामार्गालगत अनेक वृक्ष लावलेले आहेत. निमोण...

दुधाला किमान पाच रुपये अनुदान द्या -सतिशराव कानवडे

संगमनेर:-कोरोना महामारीच्या संकटामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. टाळेबंधीच्या नावाखाली राज्य सरकारने दुधाचे भाव...

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...