गणपती विसर्जन तयारी पुर्ण

0
1453

शंभर तीसरे डोळे मिरणवणूकीवर ठेवणार नजर

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
दहा दिवसांच्या उत्सावानंतर उद्या गुरूवारी आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तीभावाने गणेशभक्त निरोप देणार आहे. या निरोप व विसर्जन मिरवणूकीसाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली असून हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना पुर्ण करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोब पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादचे भव्य मिरवणूक शुक्रवारी काढण्यात येणार आहे. त्याची ही तयारी पोलीस प्रशासनाने पुर्ण केली आहे.


संगमनेर शहरासह संगमनेर उपविभागात (संगमनेर – अकोले तालुका) सुमारे सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. तर संगमनेर शहरात सुमारे सार्वजनिक गणेश मंडळांनी व सुमारे साडेतीन हजारपेक्षा अधिक घरगुती गणपती विराजमान केले आहे. दरम्यान शहरातील महत्त्वाच्या काही पाच ते सात मंडळांनी आपल्या गणरायचे भक्ती भावात विसर्जन केले असून उर्वरीत गणेश मंडळांचे गणपती विसर्जन उद्या गुरुवार सकाळपासून विसर्जन मिरवणुकीने सुरूवात होणार आहे. मागील अनुभव पहाता व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्‍वभुमीवर यावर्षी गणपती विसर्जन मिरवणूकीच्या मार्गामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. शहराच्या उत्तर विभागातील, उपनगरातील गणेश मंडळांसाठी 132 केव्ही पासून अकोले बायपास रोड मार्गे तर याच भागातील उपनगरातील गणेश मंडळांसाठी बसस्थानकापासून नविन अकोले रोड मार्गे हेल्थ क्लब रस्त्याने गंगामाई घाट या ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे.


तर शहरातील मानाचे गणपती नेहमीप्रमाणे बाजारपेठ, सय्यदबाबा चौक, मेनरोड मार्गे, विसर्जनस्थळी जाणार आहे. पोलीस व नगरपालीका प्रशासनातर्फे तसेच खासगी सामाजिक संस्थांच्यावतीने प्रवरातीरावर तीन ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर नगरापीलकेच्यावतीने घरगुती गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी हौदांची निर्मीती करण्यात आली आहे. 15 ते 20 तास चालणार्‍या या विसर्जन सोहळ्यात काही अघटीत घडू नये यासाठी पोलीसांनी सुमारे शंभरहून अधिक खासगी व सरकारी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची सोय केली आहे. तसेच 200 हून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तातसाठी तैनात राहाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here