Wednesday, October 20, 2021

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

गणेश बोऱ्हाडेंच्या याचिकेने “सत्य” आले बाहेर

संगमनेर (प्रतिनिधी)-
पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी याप्रकरणात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), वन व पर्यावरण विभागाची एकत्रित समिती स्थापन केली होती. त्या समितीचे सदस्य असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने परस्पर अहवाल सादर केल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी एकत्रित अहवाल सादर करावा असे आदेश दिले. त्या याचिकेची नुकतीच त्याची सुनावणी झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करताना तोडलेली झाडे लावली नाहीत. तोडलेली झाडे दहापट लावणे अपेक्षित होते. 5 वर्षात ही झाडे लावली गेली नाहीत. या प्रकरणी 15 सप्टेंबर २०२१ ला सुनावणी झाली तर 20/9/2021 ला या बाबत आदेश पारित करण्यात आले.
12 सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण समितीने एक अहवाल पाठविला आणि अहवालात सांगितले की, आम्ही सगळे नियम पाळले आहेत, झाडे लावली होती पण २३७३० झाडे आत्ता पर्यंत जळुन गेली असे सांगून दिशाभूल केली.

याविरुद्ध बाजू मांडताना सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांच्या वकिलाने काही प्रश्न उपस्थित केले, तेव्हा त्यांनी असे उत्तर दिले की, एक झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याचा नियम हा केंद्राचा आहे आणि आम्हाला झाडे तोडण्याची परवानगी संगमनेरच्या प्रांत कार्यालयाने दिली होती. परंतु अजून खोलात गेले असता असे समजले की संगमनेर प्रांत कार्यालयाने सुद्धा एक झाड तोडण्याच्या बदल्यात 10 झाडे लावायला सांगितली होती. त्यामुळे झाडे लावण्याचा नियम हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लागू होतो. त्यांनी ती अट पाळायला हवी होती.

दरम्यान संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी सुद्धा पत्र देऊन नमूद केले की, या महामार्गावर पुन्हा नव्याने केवळ 339 झाडे लावलेली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहिताना शशिकांत मंगरूळे यांनी सांगितले की बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आणि अटीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून 23730 झाडे लावणे अपेक्षित होते. गेल्या पाच वर्षात या संदर्भात कुठलीही कार्यवाही झालेली नाही. वृक्षतोड परवानगी आदेशानुसार 31 डिसेंम्बर 2021 पर्यंत 23730 झाडे लावावीत. या लागवडीचे गावनिहाय छायाचित्र आणि अहवाल आमच्याकडे सादर करावा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरोधात महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


2014 साली महामार्गालगत झाडे लावणे गरजेचे होते पण 5 वर्ष झाले तरी झाडे लावले नाही. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण येथे 2019 साली गणेश बोऱ्हाडे यांनी याचिका दाखल केली होती.
रस्त्याच्या मधोमध 76000 झुडपे लावल्याचेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले परंतु झुडूप आणि झाडे यात मोठा फरक आहे. हि शासनाची सरळसरळ दिशाभूल आहे असे याचिकेत म्हटले होते. विहिरीप्रमाणे आता झाडे तर गायब होत नाही ना अशी चर्चा संगमनेरकरांमध्ये रंगली आहे.
या प्रकरणात प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आहे. दरम्यान वन विभागाच्या जागेतून निघालेल्या रस्त्यासंदर्भात सुद्धा परवानगी केंद्राने नाकारल्याचे दिसून येत आहे. झाडे तोडण्यासाठी लागणाऱ्या तीन परवानग्यापैकी 1 परवानगी नसल्याचेही एका एफेडेव्हीट मध्ये समोर आले आहे.


पळसखेडे ते बोटा खिंड या रस्त्यादरम्यान तोडलेल्या झाडांबद्दल ही याचिका सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी दाखल केली होती. या याचिकेमध्ये नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या रस्त्यांचा समावेश नाही. हा निकाल गणेश बोऱ्हाडे यांच्या बाजूने लागला तर संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग 60 मध्ये नव्याने झाडे लावण्याचे आदेश देण्यात येऊ शकतात. असे झाले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या डोक्याचा ताप वाढू शकतो. महामार्ग तयार झाल्यानंतर झाडे लावले नाहीत म्हणून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरनाकडे याचिका दाखल करणारे महाराष्ट्रातील गणेश बोऱ्हाडे हे एकमेव सामाजिक कार्यकर्ते ठरणार आहेत.
हा निर्णय बोऱ्हाडे यांच्या बाजूने लागला आणि संपूर्ण राज्यभरातील महामार्गांचा प्रश्न उपस्थित झाला तर महाराष्ट्रभर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संस्थेला झाडे लावण्याचे आदेश देण्यात येऊ शकतात. असे झाले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत अधिकाऱ्यांना जन्मभराची अद्दल घडू शकते.
याचिका दाखल करण्यासाठी होणारा वेळ व खर्च हा मोठ्या प्रमाणावर होतो. याकामी मात्र खूप कमी लोक गणेश बोऱ्हाडे यांच्याबरोबर उभी राहिली आहेत.
कोल्हार घोटी रस्त्याच्या सुद्धा अभ्यास गणेश बोऱ्हाडे यांच्याकडून सुरू असून या महामार्गाचे काम करताना 300 ते 400 झाडी तोडली गेली आहेत. यावर्षी भंडारदरा धरण भरण्यास साधारण एक महिन्याच्या उशीर झाला. कदाचित या वृक्षतोडीमुळे सुद्धा असे झाले असावे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

ही याचिका दाखल केलेली असतानाच संबंधित अधिकारी निदान कोल्हार-घोटी महामार्गावरील कापलेली झाडे पुन्हा लावतील का? हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. गणेश बोऱ्हाडे यांनी केलेल्या या धाडसाचे कौतुक संगमनेरमधील निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

प्रांताधिकाऱ्यांचे योगदान महत्वाचे
या रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन प्रांताधिकारी निचित यांनी दिली होती. ती देताना जी अट घातली होती त्याची अंमलबजावणी होते की नाही याकडे निचित व भागवत डोईफोडे या दोन्ही तत्कालीन प्रांताधिकारी यांनी दुर्लक्ष केले होते. पण त्यानंतर आलेल्या डॉ.शशिकांत मंगरुळे या प्रांताधिकारानी या विषयाकडे गांभीर्याने बघत चक्क झाडांची मोजणीचं केली आणि वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून ती झाडे डिसेंबर २०२१ पर्यंत लावावीत म्हणून आदेश दिले आहेत.त्यामुळे भविष्यात ही झाडे लावली तर त्यात बोऱ्हाडें सोबत प्रांताधिकारी मंगरुळे यांचे योगदानही महत्वाचे असणार आहे.

एक प्रतिक्रिया

  1. Excellent move, so called social activist should be enough alert and should have to punish the implementation authority means contractor concerned and the government staff under whom that work being carried out should have to be enough cautious to avoid essential part of contract to safeguard the nature. To plant trees is the national work.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...