Saturday, May 1, 2021

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याआधीच ४५ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण केलं जात होतं. “राज्यात मोफत लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारला २ कोटी व्हॅक्सिन विकत घ्यावे लागतील. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे”, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, “राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकार तयार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या १ मे पासून राज्यात होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण मोफत करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र लसीकरणाविषयी चर्चा सुरू झाली होती. राज्यातल्या तरूण वर्गाने लसीकरणाची तयारी देखील केली होती. मात्र, राज्यात या वर्गासाठी १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये यासंदर्भातला निर्णय झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असला, तरी येत्या ६ महिन्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

“१ मे ला राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. आज लगेच आपल्याला लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत. त्यामुळे तरुणांना माझं नम्र आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने काम घ्यावं लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन अॅप वापरणं सक्तीचं आहे. त्यामुळे आधी नोंदणी करूनच नोंदणी केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे”, असं यावेळी राजेश टोपे म्हणाले.

“आपल्याला इच्छा असूनसुद्धा लसी उपलब्ध होत नसल्यामुळे १ मे ला लसीकरण सुरू करता येणार नाहीये. पण आपण यावर काम करत आहोत. ५ कोटी ७१ लाख लोकांना लसीकरण करायचं आहे. त्यासाठी वरीष्ठ मंत्र्यांची एक समिती याचं सूक्ष्म नियोजन करत आहे. १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ अशा वर्गवारीवर काम सुरू आहे. ३५ ते ४४ हा गट आधी घेता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यातले सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र वेगळे असतील आणि ४५ वयोगटाच्या पुढचे केंद्र वेगळे असतील”, अशी देखील माहिती राजेश टोपे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,904चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...