युवावर्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील इंदिरा नगर गल्ली नंबर १ मधील डॉ. अनिकेत गोसावी यांच्या डॉ. गोसावी हॉस्पिटलमध्ये स्व. डॉ. विठ्ठलगीर गोसावी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मंगळवार दि. १४ मार्च २०२३ रोजी मोफत स्री रोग व प्रसुती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात रूग्ण महिलेची मोफत तपासणी व सल्ला तसेच मोफत औषधही दिले जाणार आहे. अशी माहिती डॉ. अनिकेत गोसावी यांनी दिली.
स्व. डॉ. विठ्ठलगीर गोसावी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात सहभागी झालेल्या गर्भवतीची नाॅर्मल डिलीवरी सवलतीच्या दरात केली जाईल तसेच गर्भ पिशवीची शस्त्रक्रिया व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया देखील सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. महिलांसाठी सर्व सुविधा युक्त या हॉस्पिटलमध्ये आयोजित या शिबीरात गरजू महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.