संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेरच्या सहकारी संस्थांची मातृसंस्था असलेल्या व राज्यात एक नंबरचा शेतकी संघ म्हणून लौकिक असलेल्या संगमनेर शेतकी सहकारी संघाची निवडणूक काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली असून संगमनेरच्या वैभवशाली व समृद्ध सहकार परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे .यामुळे हा तालुका राज्यात समृद्ध व संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांची मातृसंस्था असलेला शेतकी संघ हा आपल्या उत्कृष्ट कारभाराने राज्यात एक नंबरचा ठरला आहे .सहकाराची समृद्ध परंपरा जपताना 2022 -20 27 या कार्यकाळातील पंचवार्षिक निवडणूक आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध केली आहे .या नवीन बिनविरोध संचालक मंडळामध्ये सर्वसाधारण गटामधून विद्यमान चेअरमन संपतराव विष्णू डोंगरे ,सुनील जयराम कडलग, दिलीप काशिनाथ वरपे, बाळकृष्ण ठाकाजी होडगर, ॲड. ज्ञानेश्वर हरिभाऊ सांगळे, किरण भागाजी नवले, भाऊसाहेब सावळेराम नवले, साहेबराव बाबुराव बारवे, संतोष रामभाऊ नागरे, शिवाजी यादव दिघे, तुकाराम रामभाऊ कोठवळ ,सचिन रामनाथ दिघे यांचा समावेश आहे. तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून खेमनर महादू सखाराम, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून प्रभाकर संभाजी सोनवणे ,महिला राखीव मधून सौ मंगल कैलास ठाकरे व सौ प्रभावती ज्ञानदेव ढोकरे व इतर मागासवर्गीय मतदार संघातून संजय महादू क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा मा.महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यशोधन कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेरच्या शेतकी संघाला वैभवशाली नेतृत्वाची मोठी परंपरा आहे. अत्यंत काटकसर व पारदर्शकतेतून या संघाने आपला राज्यभर लौकिक निर्माण केला आहे. संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था या देशात अग्रगण्य आहेत. नवीन संचालक मंडळ हे अत्यंत गुणवत्तेने चांगले काम करून शेतकी संघाचा लौकिक आणखी वाढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाय एन कापसे तर सहाय्यक म्हणून मॅनेजर अनिल थोरात व काळे यांनी काम पाहिले. या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा.खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात , ॲड. माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे ,रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, अमित पंडित, शंकरराव पा. खेमनर, ,कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,लक्ष्मणराव कुटे ,रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे ,राजेंद्र कडलग ,नवनाथ आरगडे, सौ सुनंदाताई जोर्वेकर, विश्वासराव मुर्तडक, बापूसाहेब गिरी , मॅनेजर अनिल थोरात आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.