Sunday, July 11, 2021

नगर-औरंगाबाद रोडवर भीषण अपघातात पाच जण जागीच ठार

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार झाले. हा अपघात आज सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास झाला. कारमधील मृत जालना जिल्ह्यातील आहेत.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार स्वीफ्ट कार (क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) औरंगाबादहून नगरकडे येत होती. देवगड फाट्याजवळ नगरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसशी (एमएच १९ वाय ७१२३) तिची धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. ते सर्वजण जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते. अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुरळक होती.

या अपघाताची माहिती समजताच नेवाशाचे फौजदार भरत दाते यांनी आपले सहकारी पोलिस कर्मचारी अशोक नागरगोजे, बबन तमनर, दिलीप कुऱ्हाडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तेते स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी आसल्याने सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. पहाटेची वेळ असल्याने दोन्ही वाहने भरधाव वेगाने जात असावीत. त्यातच चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

नामदार थोरात यांच्या उपस्थितीत गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान

संगमनेर (प्रतिनिधी) सन 2019- 20 या गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान रविवार दिनांक 11 जुलै 2021...

शहिद जवान गोकुळ कचरे यांच्या परिवारास ५१ हजार १५१ रुपयांची मदत; सैनिक कल्याण समितीची बैठक उत्साहात – विविध ठराव मंजूर

संगमनेर (प्रतिनिधी)सैनिक कल्याण समिती संगमनेर (महाराष्ट्र राज्य) समितीची मासिक मीटिंग रविवार दिनांक 4 जुलै रोजी समितीच्या कार्यालयात...

…माझ्यासाठी तो कॅच ऑफ द इयर : सचिन तेंडुलकर ; हरलीन देओलचा सुपरकॅच व्हायरल, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक...

सावधान : जिल्ह्यात कोरोना वाढतोय; संगमनेरातही रूग्णसंख्येत वाढ – 60 रूग्णांची भर

संगमनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही दिवसांपासून किंचित वाढ होणार्‍या कोरोनामध्ये आज मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज...

रविवारी 500 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण- सौ. दुर्गाताई तांबे

संगमनेर (प्रतिनिधी)कोरोना पार्श्‍वभूमीवर संगमनेर शहरातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना संगमनेर नगर परिषदेच्या वतीने रविवारी दिनांक 11 जुलै 2021...