Friday, February 3, 2023

सिन्नर जवळ महामार्गावर भीषण अपघात ; विचित्र अपघातात बस पेटली, तीन ठार

सिन्नर (प्रतिनिधीÌ
एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी बस तीन चार वाहनांवर आदळल्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. या विचित्र अपघातामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमींची आतापर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नाशिक सिन्नर महामार्गावरती नाशिक शहरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंदे पळसे गावाजवळ दोन बस,तीन दुचाकी, आणि एका चार चाकी, अश्या तब्बल सहा वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामुळं एसटी बसने पेट घेतला या बसमध्ये सुमारे ४३ प्रवासी होते. प्रसाशनाने व शिंदे पळसे गावातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांचा जीव वाचवला आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.


नासिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे येथील टोल नाक्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली असल्याची माहिती मिळते. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर आगाराची ही एसटी बस असून अपघातानंतर बसला लागलेल्या आगीमध्ये ती पूर्णतः जळून खाक झाली आहे. माहिती मिळतात घटनास्थळी तातडीने मदत पथके पोहोचले असून मदत कार्य सुरू झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जवळील शिंदे पळसे टोल नाक्यावर कारचालक अचानक थांबल्यामुळे एसटी बस कारवर जाऊन धडकली. या दोन्ही वाहनांमध्ये दोन-तीन दुचाकी देखील अडकल्या होत्या. अपघातानंतर एसटी बसने लगेचच पेट घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ पसरले होते.

घटनास्थळी बघ्यांनी देखील मोठी गर्दी केली. यामुळे या महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पेटलेली बस विझविली. मात्र ही बस जळून पूर्णता खाक झाली होती. काही दिवसापूर्वी नाशिकच्या औरंगाबाद नाक्यावर घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या अपघातात एका ट्रकने खासगी प्रवासी बसला दिलेल्या धडकेनंतर प्रवासी बस पेटली होती. त्यानंतर बस जळून खाक झाली या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला होता. शिंदे पळसे टोल नाक्यावर घडलेल्या अपघातात जखमींपैकी नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा निश्चित आकडा समोर आला नसला तरी प्राथमिक अंदाजानुसार तिघा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.


टोल नाक्यावर तातडीने मदत मिळाल्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकले आहेत. प्रशासन आपल्या यंत्रणेसह घटनास्थळी मदत कार्य करत असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. या अपघातातील आठ जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, नाशिक- पुणे महामार्गावर अपघात झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या व महामार्गावरील संपूर्ण वाहतूक खोळंबली होती.

शिंदे पळसे हा टोलनाका वाहनचालकांठी जीवघेणा ठरत आहे. वाहनाचे भंपर खाली जमिनीला टेकतात, ते आदळून फुटतात, खड्ड्यांमुळे टायर कट होतात, परिनामी टायर फुटतो किंवा गाडी दुसऱ्या गाडीखाली जाते. अशा अनेक कारणांनी हा मार्ग वादग्रस्त ठरला असून अनेक अपघातांना कारण ठरला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

लोकनेते आ. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी संगमनेरात शिंदेशाही बाणा कार्यक्रम

शिंदेशाही बाणा कार्यक्रमआनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांची उपस्थितीतयुवावार्ता (प्रतिनिधी)...

वाघापूरमध्ये वडाच्या झाडाची अवैध कत्तल

वडाच्या झाडाची अवैध कत्तलहजारो पक्षी बेघर, कारभारीच झाले वैरी - वनविभागाचे दुर्लक्ष

गुंजाळ कन्स्ट्रक्शनचे विक्रम गुंजाळ यांचे निधन

विक्रम गुंजाळयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - येथील सिव्हिल इंजिनियर असलेले व शहर विकासाचे अनेक शासकीय कामे उत्कृष्ट पध्दतीने करणारे...

सर्वपक्षीय पाठिंब्याने सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित

सत्यजित तांबेआता प्रतिक्षा केवळ मताधिक्याचीयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - तांत्रिक अडचणीमुळे अपक्ष उमेदवारी...

संगमनेरच्या युवकांचे हाफ आयर्नमन स्पर्धेत यश

हाफ आयर्नमन स्पर्धेत यशसंगमनेरवासियांसाठी उद्योजकांचा दिशादर्शक सहभागयुवावार्ता (प्रतिनिधी)नुकतीच कोल्हापूर येथे डेक्कन स्पोर्टस्...