Saturday, September 18, 2021

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार : नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश; ४३ मंत्र्यांची यादी जाहीर ; शपथविधी सुरु

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून दिल्लीकडे सगळ्यांकडे लक्ष लागलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह काही जणांची नावे चर्चेत होती. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी वेगवान घडामोडी सुरू होत्या. शपथविधीची वेळ जवळ येत असतानाच कुणाला मंत्रिमंडळात घेणार याविषयी राजकीय वर्तुळात धाकधूक वाढली होती. मात्र, अखेर यावरील पडदा दूर झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या ४३ मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यात नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चार जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. या मंत्र्यांचा शपथविधी सुरु झाला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली होती. यात नारायण राणे यांचं नाव आघाडीवर होतं. त्याचबरोबर हिना गावित, भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील, प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं होतं. मात्र, सकाळपासून केवळ वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात होते. त्यामुळे कुणाचा मंत्रिमंडळात समावेश होणार याविषयीची संदिग्धता कायम होती. सरकारकडून यादी जाहीर करण्यात आली असून, सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा खरी ठरली असून, अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

एकीकडे राजीनामे घेण्यात आले असले तरी दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काही मंत्र्यांची बढती (प्रमोशन) करण्यात आलं आहे. यात हरदीप पुरी, अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, किरन रिजिजू, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांना बढती मिळाली आहे. राज्यमंत्री असणाऱ्या या नेत्यांना कोणती नवीन जबाबदारी देण्यात येणार हे यादी जाहीर करताना स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

मंत्रीमंडळामध्ये समावेश करण्यात आलेल्या नेत्यांची यादी खालील प्रमाणे…

१) नारायण राणे २) कपिल पाटील ३) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री ) ४) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार) ५) रामचंद्र प्रसाद सिंघ ६) अश्विनी वैष्णव ७) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख) ८) किरन रिजिजू ९) राज कुमार सिंघ १०) हरदीप पुरी ११) मनसुख मांडविया १२) भुपेंद्र यादव १३) पुरुषोत्तम रुपाला १४) जी. किशन रेड्डी १५) अनुराग ठाकूर १६) पंकज चौधरी १७) अनुप्रिया पटेल १८) सत्यपाल सिंघ बाघेल १९) रजीव चंद्रशेखर २०) शोभा करंदलाजे २१) भानू प्रताप सिंघ वर्मा २२) दर्शना विक्रम जारदोश २३) मिनाक्षी लेखी २४) अन्नपुर्णा देवी २५) ए. नारायणस्वामी २६) कौशल किशोरे २७) अजय भट्ट २८) बी. एल वर्मा २९) अजय कुमार ३०) चौहान दिव्यांशू ३१) भागवंत खुंबा ३२) प्रतिमा भौमिक ३३) सुहास सरकार ३४) भागवत कृष्णाराव कराड ३५) राजकुमार राजन सिंघ ३६) भारती प्रवीण पवार ३७) बिश्वेश्वर तूडू ३८) सुशांतू ठाकूर ३९) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई ४०) जॉन बिरला ४१) डॉ. एल मुरगन ४२) निशित प्रमाणिक ४३) डॉ. विरेंद्र कुमार

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिलीच शपथ नारायण राणे यांनी घेतली असून त्यांनी हिंदी भाषेतून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत असून शपथ ग्रहण करणारे सर्व ४३ खासदार हॉलमध्ये उपस्थित आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...

हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी

संगमनेर (प्रतिनिधी)हुल्लडबाजी करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणार्‍या हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे...

संगमनेरात 25 बसचे निर्जंतुकीकरण; अ‍ॅन्टी-मायक्रोबायल ट्रिटमेंटमुळे प्रवाशांचा होणार कोरोनापासून बचाव

संगमनेर (संजय आहिरे)कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर...