Wednesday, July 14, 2021

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा ; पुलवामा येथे भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा केला एन्काउंटर

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा जवानांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आणि काही सामग्री जप्त करण्यात आली आहे.

ठार करण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची ओळख पटली असून एजाज उर्फ अबु हुरैरा असं नाव आहे. तर इतर दोन दहशतवादी स्थानिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखील पोलीस दलाला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर संयुक्त कारवाई करत परिसर सील केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. यावेळी तीन दहशतवादी ठार करण्यात आले. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर एजाज उर्फ अबु हुरैरा याचाही समावेश आहे. दरम्यान चकमकीनंतर पुलवामा शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी चिनारच्या वृक्षाजवळ आईईडी लावून घात लावण्यात आला होता. परंतु, सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे हा घात उधळण्यात आला. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी या भागाला घेराव घालून आयईडी निष्क्रिय करण्यात यश मिळवलं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

‘मेघदूता’तील आषाढरंग! – प्रवीण दवणे

।।आज आषाढाचा पहिला दिवस!‘मेघदूता’चा जन्मदिवस महाकवी कालिदास दिन म्हणून सन्मानीत केला जाताे ।।प्रतिभावंतांचे जन्मदिवस साजरे करण्याची प्रथा...

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा ; पुलवामा येथे भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा केला एन्काउंटर

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत सुरक्षा...

समनापूरचा मंडल अधिकारी जाधव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ; खरेदीखतात दुरुस्तीसाठी आठ हजारांची रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडले

संगमनेर - तालुक्यातील समनापूर येथे एका तक्रारदाराच्या खरेदीखतात चुकून एक नोंद झाली होती. त्यातील दुरुस्ती करण्यासाठी येथील...

आटा चक्की कॉपीराईट प्रकरण व्यावसायिक वैमन्यस्यातून ; गडाख मशिनरी सुरेश गडाख यांची पत्रकार परिषदेत माहिती

संगमनेर (प्रतिनिधी) कोहिनूर आटा चक्की कॉपीराईट प्रकरणात आम्हाला जाणिवपूर्वक गोवण्यात आले आहे. यासंदर्भातील पोलिस कारवाई ही चुकीच्या...

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवा – ना. थोरात

संगमनेर (प्रतिनिधी)शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तर नवीन रोजगार बरोबर उत्पादकता वाढण्या साठी मोठी मदत होईल. याकरिता सर्व शेतकर्‍यांनी कमी क्षेत्रात कमी पाण्यामध्ये...